ऑलआउट ऑपरेशनअंतर्गत 715 हॉटेल, लॉजची झाडाझडती; ७,४२६ वाहनांची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 01:40 AM2020-12-25T01:40:48+5:302020-12-25T07:02:05+5:30

Mumbai Police : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

715 hotels, lodges under allout operation; Inspection of 7,426 vehicles | ऑलआउट ऑपरेशनअंतर्गत 715 हॉटेल, लॉजची झाडाझडती; ७,४२६ वाहनांची तपासणी

ऑलआउट ऑपरेशनअंतर्गत 715 हॉटेल, लॉजची झाडाझडती; ७,४२६ वाहनांची तपासणी

Next

मुंबई : गुन्हेगार आणि बेकायदा कारवायांविरोधात मुंबई पोलिसांनी राबविलेल्या ऑलआउट ऑपरेशनअंतर्गत ३ तासांत मुंबईतील ७१५ हॉटेल, लॉज तसेच मुसाफिर खान्याची झाडाझडती घेण्यात आली. तर ११२ ठिकाणी केलेल्या नाकाबंदीत ७ हजार ४२६ वाहनांची तपासणी करण्यात आली.
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.  
पाचही प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त, १३ परिमंडळाचे पोलीस उपायुक्त आणि सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री ११ ते मध्यरात्री २ पर्यंत हे ऑपरेशन सुरू होते.

नाकाबंदीसह संवेदनशील परिसरांची पाहणी
११२ ठिकाणी नाकाबंदी, ७,४२६ वाहनांची तसेच संवेदनशील परिसरांची तपासणी करण्यात आली. ११२ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केले. ४३९ ठिकाणी पायी गस्त घालण्यात आली. यात, गंभीर गुन्ह्यांतील १ हजार ४४८ गुन्हेगार तपासण्यात आले. २३८ आरोपी हाती लागले असून त्यापैकी ९३ आरोपींवर कारवाई करण्यात आली.

३३ फरार आरोपींसह १० तडिपारांना बेड्या
ड्रग्ज संबंधित ९ कारवाया करण्यात आल्या. या ऑपरेशनदरम्यान १४ अवैध शस्त्रे पाेलिसांनी जप्त केली. 
 ३३ फरार आणि पाहिजे आरोपींसह १० तडिपार आरोपींनाही बेड्या ठोकण्यात आल्या. याशिवाय २७ अजामीन वॉरंटची बजावणीही करण्यात आली.

Web Title: 715 hotels, lodges under allout operation; Inspection of 7,426 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.