मुंबई : राज्यातील २२ जिल्ह्यांतील सुमारे ७ हजार १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आज सरासरी ७२ टक्के मतदान झाले. ग्रामीण राजकारणाचा कल स्पष्ट करणाऱ्या या निवडणुकीचा निकाल ६ आॅगस्टला जाहीर होणार आहे. पहिल्या टप्प्यात ११ जिल्ह्णांतील १ हजार ७७९ ग्राम पंचायतींमध्ये २५ जुलै रोजी मतदान झाले होते. आज दुसऱ्या टप्प्यात ७ हजार १९ ग्राम पंचायतींमध्ये मतदान झाले. ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, नाशिक, धुळे, अहमदनगर, नंदूरबार, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, जालना, हिंगोली, अकोला, वाशीम, बुलढाणा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्णांतील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले. त्यात काही ग्रामपंचायतींमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांचाही समावेश होता. (विशेष प्रतिनिधी)
७ हजार ग्रा.पं.साठी ७२ टक्के मतदान
By admin | Published: August 05, 2015 1:26 AM