लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वे गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड / रत्नागिरी आणि पनवेल - सावंतवाडी रोड / रत्नागिरीदरम्यान ७२ विशेष गाड्या चालवणार आहे. यातून फक्त आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड विशेष दररोज (३६ फेऱ्या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ५ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत ००.२० वाजता सुटून सावंतवाडी रोडला त्याच दिवशी सकाळी १४.०० वाजता पोहोचेल. सावंतवाडी रोड येथून विशेष गाडी दररोज ५ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत १४.४० वाजता सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता पोहोचेल
या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (१० फेऱ्या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ६ सप्टेंबरपासून २० सप्टेंबरपर्यंत दरसोमवारी व शुक्रवारी १३.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२.३५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल. द्वि-साप्ताहिक विशेष गाडी रत्नागिरी येथून दल ९ सप्टेंबरपासून २३ सप्टेंबरपर्यंत दररविवारी आणि गुरुवारी २३.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसऱ्या दिवशी ०८.२० वाजता पोहोचेल.
या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबणार आहेत.
पनवेल-सावंतवाडी रोड त्रि-साप्ताहिक विशेष (१६ फेऱ्या) पनवेल येथून ७ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत दरमंगळवार, बुधवार आणि शनिवारी ०८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सावंतवाडी रोडला २०.०० वाजता पोहोचेल. त्रि-साप्ताहिक विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून ७ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत दरमंगळवार, बुधवार आणि शनिवारी २०.४५ वाजता सुटून पनवेलला दुसऱ्या दिवशी ०७.१० वाजता पोहोचेल.
या गाड्या रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबणार आहेत.
पनवेल-रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (१० फेऱ्या) पनवेल येथून ९ सप्टेंबरपासून २३ सप्टेंबरपर्यंत दरगुरुवार आणि रविवारी ०८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५.४० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. द्वि-साप्ताहिक विशेष गाडी रत्नागिरी येथून ६ सप्टेंबरपासून २० सप्टेंबरपर्यंत दरसोमवारी आणि शुक्रवारी २३.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.०० वाजता पनवेलला पोहोचेल. या गाड्या रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबणार आहेत.