गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वेच्या ७२ विशेष गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 10:38 AM2021-07-06T10:38:22+5:302021-07-06T10:38:32+5:30
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड विशेष दररोज (३६ फेऱ्या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ५ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत ००.२० वाजता सुटून सावंतवाडी रोडला त्याच दिवशी सकाळी १४.०० वाजता पोहोचेल.
मुंबई : मध्य रेल्वे गणपती उत्सवासाठी कोकणात ७२ विशेष गाड्या चालवणार आहे. यातून फक्त आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड विशेष दररोज (३६ फेऱ्या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ५ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत ००.२० वाजता सुटून सावंतवाडी रोडला त्याच दिवशी सकाळी १४.०० वाजता पोहोचेल.
सावंतवाडी रोड येथून रोज १४.४० वाजता सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता पोहोचेलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (१० फेऱ्या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ६ सप्टेंबरपासून २० सप्टेंबरपर्यंत दरसोमवारी व शुक्रवारी १३.१० वाजता सुटेल व त्याच दिवशी २२.३५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल. रत्नागिरी येथून ९ सप्टेंबरपासून २३ सप्टेंबरपर्यंत दररविवारी आणि गुरुवारी २३.३० वाजता सुटेल.
पनवेल-सावंतवाडी रोड त्रि-साप्ताहिक विशेष (१६ फेऱ्या) पनवेल येथून ७ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत दरमंगळवार, बुधवार व शनिवारी ०८.०० वाजता सुटेल व त्याच दिवशी सावंतवाडी रोडला २०.०० वाजता पोहोचेल. सावंतवाडी रोड येथून ७ ते २२ सप्टेंबरपर्यंत दरमंगळवार, बुधवार आणि शनिवारी २०.४५ वाजता सुटून पनवेलला दुसऱ्या दिवशी ०७.१० वाजता पोहोचेल. पनवेल-रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (१०फेऱ्या) पनवेल येथून ९ सप्टेंबरपासून २३ सप्टेंबरपर्यंत गुरुवार व रविवारी ०८.०० वाजता सुटेल व त्याच दिवशी १५.४० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. रत्नागिरी येथून ६ ते २० सप्टेंबरपर्यंत सोमवारी व शुक्रवारी २३.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ०६.०० वाजता पनवेलला पोहोचेल.