सौर कृषिपंप योजनेसाठी आठवडाभरात ७२४ अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 05:57 AM2019-01-22T05:57:35+5:302019-01-22T05:57:41+5:30
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्वतंत्र पोर्टलचा लाभ घेत मागील सात दिवसांत सुमारे ७२४ शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्वतंत्र पोर्टलचा लाभ घेत मागील सात दिवसांत सुमारे ७२४ शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत.
पोर्टलवर शेतकºयांना सौर कृषिपंपासाठी अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेबपोर्टलवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेची संपूर्ण माहिती, आॅनलाइनद्वारे शेतकºयांच्या मागणीनुसार सौर कृषिपंपाची क्षमता ठरविणे, अर्जाची सद्य:स्थिती बघणे आणि शेतकºयांकडून नेहमी विचारण्यात येणाºया प्रश्नांची माहिती, याशिवाय मराठी, इंग्रजी या भाषेतील आॅडिओ-व्हिडीओ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पोर्टलवर योजनेअंतर्गत सौर कृषिपंपासाठी कंत्राटदार निवडण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांना या पोर्टलद्वारे कंत्राटदाराची निवड करून त्या कंत्राटदाराकडून सौर कृषिपंप बसवून घेता येईल, अशी माहिती महावितरणने दिली.