लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: म्हाडाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीला अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून आजवर सुमारे ७३,८४८ अर्जदारांनी अर्ज केले असून त्यापैकी ५१,००० अर्जदारांनी अनामत रकमेसह ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत.
३१ ऑक्टोबर रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करण्याची मुदत आहे, तसेच बँकेच्या कार्यालयीन वेळेत आर टी जी एस / एन ई एफ टी द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
- पुणे जिल्ह्यातील ५४२५ सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील ६९ सदनिका, सांगली जिल्ह्यातील ३२ सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यातील ३३७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
- या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत ४३१ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २५८४ सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेंतर्गत २४४५ सदनिका विक्रीसाठी आहेत. ५१,००० अर्जदारांनी अनामत रकमेसह ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत.
- पुणे येथील कार्यालयात २४ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता सोडत काढली जाणार आहे.
- सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.
- सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे