मुंबईत रविवारी सापडले ७३३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:06 AM2021-06-21T04:06:16+5:302021-06-21T04:06:16+5:30
मुंबईत रविवारी ७३३ रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख २१ हजार ३७० वर पोहोचला आहे. १९ रुग्णांचा ...
मुंबईत रविवारी ७३३ रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख २१ हजार ३७० वर पोहोचला आहे. १९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १५ हजार २९८ वर पोहोचला आहे. दिवसभरात ६५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या ६ लाख ८८ हजार ९९० वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या १४ हजार ८०९ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या १५ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत, तर ८० इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी रविवारी २८ हजार २२६, तर आतापर्यंत एकूण ६८ लाख १५ हजार २८ चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली