लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रेमसंबंधात असलेले ७४ टक्के भारतीय आताच्या किंवा आधीच्या जोडीदाराला ऑनलाइन स्टॉक करतात, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणाद्वारे काढण्यात आला. ४६ टक्के भारतीयांनी मान्य केले की, पकडले जाणार नाही हे माहीत असले तर ते सध्याच्या, आधीच्या जोडीदाराला स्टॉक करतील. ५९ टक्के भारतीयांच्या मते जोडीदाराची शारीरिक सुरक्षा आणि मानसिक स्वास्थ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाइन स्टॉकिंग करण्यास हरकत नाही.
सर्वेक्षणात १० देशांमधील १८हून अधिक वयाचे दहा हजारांहून अधिक, तर एक हजार भारतीय सहभागी झाले हाेते. २६ टक्के सहभागींनी सांगितले की, त्यांनी जोडीदाराच्या पासवर्डची माहिती वापरून त्यांच्या डिव्हाईस, ऑनलाइन अकाऊंटवर ॲक्सेस मिळवला. तर २५ टक्के जणांनी जोडीदाराचे टेक्स्ट मेसेज, डायरेक्ट मेसेज, ई-मेल्स किंवा फोटोवर गुप्तपणे नजर ठेवण्यासाठी ॲपचा वापर केला. जोडीदार आपल्यासोबत हेच करत असल्याचे कळल्यानंतर आपणही ऑनलाइन स्टॉकिंग सुरू केल्याचे ३३ टक्के जणांनी सांगितले. ३९ टक्के जणांनी सांगितले की, जोडीदार शारीरिक, मानसिकदृष्ट्या सुरक्षित आहे का, याची खात्री करायची होती.
‘ऑनलाइन स्टॉक’ म्हणजे काय?‘ऑनलाइन स्टॉक’ किंवा ऑनलाईन हॅक म्हणजे जोडीदाराच्या माेबाईलच्या पासवर्डची माहिती वापरून त्याच्या डिव्हाईस आणि ऑनलाइन अकाऊंटवर ॲक्सेस मिळवणे. जोडीदाराचे टेक्स्ट मेसेज, फोन कॉल्स, डायरेक्ट मेसेज, ई-मेल्स किंवा फोटोवर गुप्तपणे नजर ठेवण्यासाठी ॲपचा वापर करणे इत्यादी.
लक्ष देणे, नजर ठेवणे यात फरकअनेकांसाठी इतरांचा असा ऑनलाइन पाठपुरावा करणे म्हणजे काही गुन्हा नव्हे. मात्र, ही सवय बनते आणि त्यातून कोणावर नजर ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, तेव्हा समस्या निर्माण होतात. एखाद्या व्यक्तीकडे लक्ष देणे आणि त्या व्यक्तीवर नजर ठेवणे यात फरक आहे, हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे.- रितेश चोप्रा, तज्ज्ञ
स्टॉकिंगचे हाताळले जाणारे प्रकारnजोडीदाराच्या डिव्हाईसवर सर्च हिस्ट्री तपासणे : ३२ टक्केnजोडीदाराच्या डिव्हाईसवरील टेक्स्ट मेसेज, फोन कॉल्स, डायरेक्ट मेसेज, ई-मेल किंवा फोटो तपासणे : ३१ टक्केnलोकेशन-शेअरिंग ॲपच्या माध्यमातून जोडीदाराचे लोकेशन ट्रॅक करणे : २९ टक्के
भारतीय प्रौढांच्या मते...n५२ टक्के जणांच्या मते आताच्या, आधीच्या जोडीदाराला ऑनलाईन स्टॉक करण्यात काहीच गैर नाही.n५९ टक्के जणांच्या मते जोडीदाराच्या शारीरिक किंवा मानसिक हितासाठी ऑनलाईन स्टॉकिंग करणे चालू शकते.n५३ टक्के जणांच्या मते दोघांपैकी एका जोडीदाराने किंवा दोघांनीही प्रतारणा केली असेल किंवा प्रतारणेचा संशय असेल तर ऑनलाईन स्टॉकिंग योग्य ठरते.n५१ टक्के जणांच्या मते प्रत्यक्षात स्टॉक केले जात नसेल तर त्यांना ऑनलाईन स्टॉकिंगने काहीच फरक पडत नाही.