- सचिन लुंगसेमुंबई : देशात आतापर्यंत ५५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, येथील पावसाची सर्वसाधारण नोंद ५६० मिलीमीटर एवढी आहे. महत्त्वाचे म्हणजे, देशात सर्वाधिक पाऊस मध्य महाराष्ट्रात नोंदविण्यात आला आहे. १ जूनपासून १२ आॅगस्टपर्यंतच्या नोंदीनुसार, मध्य महाराष्ट्रात ८५३.७ मिलीमीटर म्हणजे ७४ टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला असून, येथील पावसाची सर्वसाधारण नोंद ४९० मिलीमीटर एवढी आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात ३१७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस उणे १९ टक्के आहे. विदर्भात ६०१ मिलीमीटर पाऊस झाला. हा उणे १ टक्का आहे. कोकण आणि गोव्यात ३ हजार १०६ मिलीमीटर म्हणजे ४६ टक्के अधिक पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात ६० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सौराष्ट्र आणि कच्छ, गुजरात, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर आणि दक्षिण कर्नाटक, कोकण आणि गोवा या सात उपविभागांत २० ते ५९ टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.पश्चिम कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी आणि करकळ, लक्षद्वीप, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, तेलंगणा, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, ओरिसा, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश,बिहार, सिक्किम, आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर या उपविभागात सामान्य पावसाचीनोंद झाली आहे. तर रायलसीमा, झारखंड, गंगटेक, पश्चिम उत्तरप्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या उपविभागात उणे ५९ ते उणे २० टक्के कमी एवढ्या पावसाची नोंदझाली आहे.मुंबईत ९०० मिलीमीटर अधिकच पाऊसमुंबईत १२ आॅगस्टपर्यंत २ हजार ४७२.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षी १ हजार ५८२.१ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला होता. या वर्षी ९०० मिमी अधिक पाऊस झाला.१ जून ते १२आॅगस्टपर्यंतचा पाऊस (टक्क्यांत)मुंबई २३, रायगड ५०, पालघर ६६, ठाणे ६४, रत्नागिरी ४२, सिंधुदुर्ग ३७, नाशिक ९०, धुळे ७२, नंदुरबार ८१, जळगाव २४, औरंगाबाद -३, पुणे १४१, सातारा ८०, सांगली ५७, कोल्हापूर ७७, अहमदनगर ३१, सोलापूर -४१, उस्मानाबाद -१९,बीड -४१, जालना -२२, बुलडाणा १०, अकोला ७, अमरावती ०, वाशिम -२४, परभणी -२६, लातूर -२९, नांदेड -७, हिंगोली -१४, यवतमाळ -२८, वर्धा ३, नागपूर ७, चंद्रपूर ६, भंडारा -१२,गोंदिया -२१, गडचिरोली १३
राज्यात ७४ टक्के अधिक पाऊस; मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक ८५३ मिमी पावसाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 6:17 AM