राज्यात काेराेनाचे ७५ हजार ७६७ सक्रिय रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:06 AM2020-12-08T04:06:49+5:302020-12-08T04:06:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात सोमवारी सक्रिय रुग्णांमध्ये मोठी घट झालेली दिसून आली. सध्या राज्यात ७५ हजार ७६७ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सोमवारी सक्रिय रुग्णांमध्ये मोठी घट झालेली दिसून आली. सध्या राज्यात ७५ हजार ७६७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील सात दिवसांत १३ हजार ४२२ सक्रिय रुग्ण कमी झाले. १ डिसेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ८९ हजार ९८ इतकी होती. राज्यात दिवसभरात काेराेनाच्या ३ हजार ७५ रुग्णांचे निदान झाले असून ४० मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८ लाख ५५ हजार ३४१ झाली असून मृतांचा आकडा ४७ हजार ७७४ इतका आहे. बरे होण्याचे प्रमाण ९३.२८ टक्क्यांवर आले असून मृत्यूचे प्रमाण २.५८ टक्के आहे.
राज्यात साेमवारी दिवसभरात काेराेनाचे ७ हजार ३४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण १७ लाख ३० हजार ७१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १३ लाख १८ हजार ७२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.३९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५५ हजार १८० व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ५ हजार ५६५ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.