राज्यातील ITI संस्थांमध्ये आता ७५ व्हर्चुअल क्लासरूम; एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 05:13 PM2023-08-13T17:13:27+5:302023-08-13T17:15:01+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन
मुंबई: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ७५ व्हर्चुअल क्लासरूमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन होणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)मध्ये दूरदृष्य प्रणाली द्वारे हे उद्घाटन होणार आहे.यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कौशल्य विकास मंत्री मंत्री लोढा म्हणाले, व्हर्चुअल क्लासरूममध्ये इंटरॲक्टीव्ह पॅनल,संगणक सेवा, उत्तम बैठक व्यवस्था असणार आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'स्कील इंडिया' व 'डिजिटल इंडिया' या उपक्रमातंर्गत राज्यातील ४१९ या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)मध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाद्वारे ४१९ शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे बळकटीकरण व ५४७ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सहकार्य करून राज्यात युवक व युवतींना रोजगाराभिमुख कौशल्य विकास करण्यावर भर देण्यात येत आहे.