७५० दशलक्ष लीटरची पाणीगळती रोखणार! मुंबई महापालिका वापरणार परदेशी तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 03:19 PM2024-01-01T15:19:37+5:302024-01-01T15:19:55+5:30

या जलवाहिन्यांची देखभाल करणे मोठे जिकिरीचे असते. 

750 million liters of water will be prevented Mumbai Municipal Corporation will use foreign technology | ७५० दशलक्ष लीटरची पाणीगळती रोखणार! मुंबई महापालिका वापरणार परदेशी तंत्रज्ञान

७५० दशलक्ष लीटरची पाणीगळती रोखणार! मुंबई महापालिका वापरणार परदेशी तंत्रज्ञान

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचे ३८० किमी अंतराचे जाळे आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी प्रमुख धरणे ही ठाणे जिल्ह्यात आहेत. त्या ठिकाणांहून थेट मुंबईपर्यंत जलवाहिन्या टाकल्या आहेत. या जलवाहिन्यांची देखभाल करणे मोठे जिकिरीचे असते. 

गळती होत असलेल्या ठिकाणी काही लोक आणखी भगदाड पाडून पाण्याची चोरी करतात. त्यामुळे पाणी गळती आणि चोरी अशा दुहेरी संकटामुळे दररोज ७५० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी महापालिकेकडून या जलवाहिन्या मजबूत करण्यासाठी परदेशी तंत्रज्ञान वापरण्याचा  निर्णय घेतला असून, या कामात तरबेज असणाऱ्या काही कंपन्यांकडून याबाबत सादरीकरण केले आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये वांद्रे आणि मालाड मार्वे येथे मोठ्या व्यासाची जलवाहिन्या फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली होती. अशा प्रकारे जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार अधूनमधून होतात. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचे ३८० किमी अंतराचे जाळे आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी प्रमुख धरणे ही ठाणे जिल्ह्यात आहेत. त्या ठिकाणांहून  थेट मुंबईपर्यंत जलवाहिन्या टाकल्या आहेत. 

या जलवाहिन्यांची देखभाल करणे मोठे जिकिरीचे असते. गळती होत असलेल्या ठिकाणी काही लोक आणखी भगदाड पाडून पाण्याची चोरी  करतात. त्यामुळे पाणी गळती आणि चोरी अशा दुहेरी  संकटाचा पालिकेला सामना करावा लागत आहे. यामुळे रोज ७५० दशलक्ष लिटर पाणी वाया जात असते; मात्र परदेशी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे गळती रोखता येणार आहे. 

सर्वच ठिकाणी जलबोगदे अशक्य
मुंबईला दररोज ३९०० दशलक्ष  लीटर पाणीपुरवठा होतो. मुळात मुंबईची पाण्याची मागणी चार हजार दशलक्ष लीटरपेक्षा जास्त आहे. एका अर्थाने मुंबईला  होणार पाणीपुरवठा कमी आहे. 

पाण्याची गळती होणे, जलवाहिन्या फुटणे आणखीनच त्रासदायक आहे. त्यामुळेच काही जलवाहिन्या बदलून भूमिगत बोगद्यातून पुरवठा करण्याचे प्रकल्प राबवले जात असून काही प्रकल्प पूर्ण झाले  आहेत; मात्र सर्वच ठिकाणी जलबोगदे करणे शक्य नसल्याने उर्वरित ज्या काही जलवाहिन्या असतील त्यांच्या मजबुतीकरणावर भर दिला जात आहे. 

त्यासाठीच परदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्या माध्यमातून  जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती रोखता येईल.  मुंबईहून बाहेरून मुंबईपर्यंत  येणाऱ्या या जलवाहिन्या जंगले, दुर्गम भाग या ठिकाणी आहेत. तेथील वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर होत असतो.
 

Web Title: 750 million liters of water will be prevented Mumbai Municipal Corporation will use foreign technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.