Join us

७५०० कोटी रु. खर्चून बनणार वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 4:44 AM

वर्सोवा-वांद्रे असा ९.६० किलोमीटरचा सागरी सेतू उभारण्याबरोबरच वांद्रे, कार्टर रोड जोडरस्ता, नाना नानी पार्क जोडरस्ता उभारण्यासाठीच्या ७ हजार ५०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पास राज्य शासनाने आज प्रशासकीय मान्यता दिली.

मुंबई : वर्सोवा-वांद्रे असा ९.६० किलोमीटरचा सागरी सेतू उभारण्याबरोबरच वांद्रे, कार्टर रोड जोडरस्ता, नाना नानी पार्क जोडरस्ता उभारण्यासाठीच्या ७ हजार ५०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पास राज्य शासनाने आज प्रशासकीय मान्यता दिली.सध्याच्या वरळी-वांद्रे सागरी सेतू या प्रकल्पामुळे थेट वर्सोवापर्यंत जाईल. त्याच बरोबर वर्सोव्याच्या बाजूने तसेच वरळीच्या बाजूने नाना-नानी पार्कपर्यंत जोडरस्ताही बांधण्यात येणार आहे. या शिवाय, वांद्रे, कार्टर रोड येथेही जोडरस्ता बांधला जाईल. राज्य रस्ते विकास महामंडळ हे या प्रकल्पाची अंमलबजावणी करेल. सध्याच्या सागरी सेतूप्रमाणेच नवीन सागरी सेतूवरही पथकराची वसुली करण्यात येणार आहे.या आधीही १८ आॅगस्ट २००९ रोजी मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीच्या बैठकीत हा प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली होती. शासनाने १९ डिसेंबर २००९ रोजी प्रकल्पाच्या मान्यतेचा आदेशही काढला होता. जानेवारी २०१३ मध्ये केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाकडून सागरी किनापट्टी नियमन क्षेत्र आणि पर्यावरण मंजुरी प्राप्त करून घेण्यात आली होती. तथापि, या प्रकल्पाची उभारणी सुरू होऊ शकली नाही.वर्सोव्याच्या बाजूने व वरळीच्या बाजूने नाना-नानी पार्कपर्यंत जोडरस्ता बांधण्यात येणार आहे. कार्टर रोड येथेही जोडरस्ता बांधला जाईल. राज्य रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पाची अंमलबजावणी करेल.

टॅग्स :मुंबई