75वा स्वातंत्र्यदिन; भाजयुमोच्या वतीने काढण्यात आली 75 किलोमीटरची 'युवा संकल्प यात्रा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 05:35 PM2021-08-15T17:35:06+5:302021-08-15T17:37:01+5:30
युवा संकल्प यात्रेची सुरूवात भाजप महाराष्ट्रचे उपाध्यक्ष,विधान परिषद सदस्य प्रसाद लाड, राष्ट्रीय कोषाध्यक्ष साई प्रसाद आणि भाजयुमो, मुंबईचे अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी माहिमच्या स्वामी विवेकानंद उद्यानात स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला हार घालून केली.
मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजयुमो, मुंबईच्या वतीने देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आज 75 किलोमीटरची ' युवा संकल्प यात्रा ' काढण्यात आली. यात हजारोच्या संख्येने युवक आणि युवतींनी सहभाग घेतला. देशाची एकता,अखंडता मजबूत करण्यासाठी त्यांनी संकल्प केला.
युवा संकल्प यात्रेची सुरूवात भाजप महाराष्ट्रचे उपाध्यक्ष,विधान परिषद सदस्य प्रसाद लाड, राष्ट्रीय कोषाध्यक्ष साई प्रसाद आणि भाजयुमो, मुंबईचे अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी माहिमच्या स्वामी विवेकानंद उद्यानात स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला हार घालून केली. या यात्रेत मुंबईच्या सर्व सहा जिल्ह्यांच्या हजारो युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
युवा भाजप कार्यकर्त्यांनी भारतमातेचा जयजयकार करून काहींनी पदयात्रेच्या माध्यमाने, काहींनी सायकलवरून, तर काही मॅरेथॉन प्रमाणे धावत या 75 किलोमीटरच्या युवा संकल्प यात्रेत सहभाग घेतला. यात्रेनंतर भाजपचे युवा कार्यकर्ता बांद्रा-वरळी सी लिंक जवळ पोहचले.तेथे ध्वजारोहण केल्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधानसभा मुख्य प्रतोद अॅड.आशीष शेलार आणि मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी कार्यकर्तांना मार्गदर्शन केले.
या वेळी सर्व युवक व युवतींनी देशाची एकता आणि अखंडता यांची रक्षा करण्यासोबतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांच्या न्यू इंडिया व्हिजन ,देशाच्या आत्मनिर्भर आणि विश्वगुरू बनण्यासोबत भारतीय नागरिकांसोबत होणारा पक्षपात,दमन तसेच शोषणाविरूद्ध लढण्याची प्रतिज्ञा घेतली.