राज्यात ७६ हजार ७५५ रुग्ण उपचाराधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:06 AM2021-08-01T04:06:18+5:302021-08-01T04:06:18+5:30
मुंबई : राज्यात सातत्याने सक्रिय रुग्णांमध्ये घट होताना दिसते आहे. सध्या ७६ हजार ७५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात ...
मुंबई : राज्यात सातत्याने सक्रिय रुग्णांमध्ये घट होताना दिसते आहे. सध्या ७६ हजार ७५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. शनिवारी दिवसभरात ७ हजार ४७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ६० लाख ९० हजार ७८६ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात शनिवारी ६ हजार ९५९ रुग्णांचे निदान झाले असून, २२५ मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ७९ लाख ६७ हजार ६०९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.१४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ७६ हजार ६०९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, तर ३ हजार १६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
राज्यात रुग्ण बरे हण्याचे प्रमाण ९६.६२ टक्के झाले असून, मृत्यूदर २.१ एवढा आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६३ लाख ३ हजार ७१५ झाली असून, १ लाख ३२ हजार ७९१ आहे. दिवसभरात नोंद झालेल्या २२५ मृत्यूंमध्ये मुंबई ९, ठाणे मनपा २, नवी मुंबई मनपा ५, वसई विरार मनपा ३, रायगड ३, नाशिक ५, नाशिक मनपा ५, मालेगाव २, अहमदनगर १९, अहमदनगर मनपा १, जळगाव २, जळगाव मनपा १, पुणे ४, पुणे मनपा ४, पिंपरी चिंचवड मनपा २, सोलापूर ४, सातारा १३, कोल्हापूर ९, सांगली २२, सिंधुदुर्ग ५, रत्नागिरी २५, औरंगाबाद ५९, औरंगाबाद मनपा २, उस्मानाबाद १, बीड ५, यवतमाळ ४, बुलडाणा २, नागपूर १, नागपूर मनपा ६ इ. रुग्णांचा समावेश आहे.
सक्रिय रुग्ण आकडेवारी
३१ जुलै - ७६ हजार ७५५
३० जुलै - ७७ हजार ४९४
२९ जुलै - ७८ हजार ५६२
२८ जुलै - ८२ हजार ५४५