Join us  

764 केंद्रे संवेदनशील

By admin | Published: October 12, 2014 1:37 AM

जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांतील सुमारे 59 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

ठाणो : जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांतील सुमारे 59 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी सहा हजार 145 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यापैकी 764 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. पाच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा  निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रे निश्चित केली गेली. घोषित केलेली 764 संवेदनशील मतदान केंद्रे 248 व्हिडीओ कॅमे:यांसह सुमारे 516 मायक्रो ऑब्झव्र्हरच्या निगराणीत राहणार आहेत. या यंत्रणोसह चोख पोलीस बंदोबस्तात या मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडेल. (प्रतिनिधी)
 
मतदान केंद्रांवर होणा:या मारामा:या किंवा नोंदविलेल्या केसेस या निकषावर संवेदनशील मतदान केंद्रे घोषित करण्यात येतात. मात्र असे प्रकार न घडल्यामुळे, छायाचित्र नसलेले आणि मतदानाला कुटुंबियांसह न येणारे मतदार हे निकष लावण्यात आले आहेत.
- पी. वेलरासू,
जिल्हा निवडणूक अधिकारी
 
या प्रत्येक संवेदनशील मतदान केंद्रांवर एक असे 248 व्हिडीओग्राफर नियुक्त करण्यात आले आहेत. जिथे व्हिडिओग्राफर आहेत तिथे  मायक्रो ऑब्झव्र्हर नियुक्त करण्यात आलेले नाही. 311 ऑब्झव्र्हर नियुक्त करण्यात आले आहेत. दोन संवेदनशील मतदान केंद्रे जवळजवळ असतील तर त्या ठिकाणची जबाबदारी एक मायक्रो ऑब्झव्र्हर पार पाडणार आहे.