गेल्या वर्षभरात मुंबईतून ७७३ अल्पवयीन मुली बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:06 AM2021-02-26T04:06:27+5:302021-02-26T04:06:27+5:30

६७३ मुलींचा शोध, १०० मुलींचे गूढ कायम प्रेमप्रकरणामुळेही होताहेत सैराट... गेल्या वर्षभरात मुंबईतून ७७३ अल्पवयीन मुली बेपत्ता ६७३ मुलींचा ...

773 underage girls go missing from Mumbai in last year | गेल्या वर्षभरात मुंबईतून ७७३ अल्पवयीन मुली बेपत्ता

गेल्या वर्षभरात मुंबईतून ७७३ अल्पवयीन मुली बेपत्ता

Next

६७३ मुलींचा शोध, १०० मुलींचे गूढ कायम

प्रेमप्रकरणामुळेही होताहेत सैराट...

गेल्या वर्षभरात मुंबईतून ७७३ अल्पवयीन मुली बेपत्ता

६७३ मुलींचा शोध; प्रेम प्रकरणामुळे होतात ‘सैराट’

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतून गेल्या वर्षभरात ७७३ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची नोंद करण्यात आली. यापैकी ६७३ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. यात १०० मुलींच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ कायम असून पोलीस अधिक तपास करत आहेत. यात बहुतांश मुली प्रेम प्रकरणातून पळून गेल्या होत्या.

एनसीआरबीच्या २०१९ च्या अहवालानुसार, राज्यभरातून ५६ हजार ७५० पुरुष आणि ६७ हजार ७४६ महिला तसेच १९ तृतीयपंथीय असे एकूण १ लाख २४ हजार ५१५ जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दप्तरी झाली. त्यापैकी ६७ हजार १८ जणांचा शोध घेण्यास यश आले. यात अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक होते. मुंबईतही अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना डोके वर काढत आहेत. यात, लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत याचे प्रमाण घटले आहे.

मुंबई पोलिसांच्या आकडेवाऱीनुसार, गेल्या वर्षभरात ७७३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. अल्पवयीन असल्याने या प्रकरणी अपहरणाची नोंद करून अधिक तपास सुरू करण्यात आला. यापैकी ६७३ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. २०१९ मध्ये १,३३४ मुलींच्या अपहरणाची नोंद झाली होती. त्यापैकी ११९५ मुलींचा पाेलिसांनी शोध घेतला.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, यातील बहुतांश मुली प्रेम प्रकरणातून ‘सैराट’ झाल्या आहेत. तर, काहींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनाही समोर आल्या. मात्र पोलिसांनी यातील अनेक मुलींचा शोध घेऊन त्यांना सुखरूप पालकांपर्यंत पोहाेचवले.

* कोणत्या वर्षात किती?

वर्ष बेपत्ता शोध

२०२० - ७७३ ६७३

२०१९ - १३३४ ११९५

२०१८ - १३३९ १०८२

* १०० मुलींचा शोध लागेना!

गेल्या वर्षभरात बेपत्ता झालेल्या मुलींपैकी १०० मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना अद्याप यश मिळालेले नाही.

* क्षुल्लक कारणातूनही सोडले घर...

बऱ्याच प्रकरणांत मोबाइलचा अतिवापर, गेम, अभ्यास न करणे शिवाय क्षुल्लक कारणातून पालक ओरडले म्हणून अल्पवयीन मुलींनी घर सोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

* कुठल्या महिन्यात किती बेपत्ता

जानेवारी - ९३

फेब्रुवारी - १०६

मार्च - ७१

एप्रिल - २२

मे - ४०

जून - ४५

जुलै - ५५

ऑगस्ट - ७६

सप्टेंबर - ७७

ऑक्टोबर - ९५

नोव्हेंबर - ९४

डिसेंबर - ८०

........................

Web Title: 773 underage girls go missing from Mumbai in last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.