Join us

राज्यात ७८ हजार ५६२ रुग्ण उपचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:07 AM

मुंबई : राज्यात गुरुवारी दिवसभरात ११ हजार १२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ६० लाख ७५ ...

मुंबई : राज्यात गुरुवारी दिवसभरात ११ हजार १२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ६० लाख ७५ हजार ८८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५९ टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात सातत्याने रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्यात सध्या ७८ हजार ५६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात गुरुवारी ७ हजार २४२ रुग्ण व १९० मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६२ लाख ९० हजार १५६ झाली असून, बळींचा आकडा १ लाख ३२ हजार ३३५ आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ७५ लाख ५९ लाख ९३८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.२३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ८७ हजार ७०४ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ३ हजार २४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

दिवसभरात नोंद झालेल्या १९० मृत्यूंमध्ये मुंबई १३, ठाणे ३, ठाणे मनपा ३, नवी मुंबई मनपा २, कल्याण डोंबिवली मनपा २, भिवंडी निजामपूर मनपा १, वसई विरार मनपा ५, पनवेल मनपा २, नाशिक ३, नाशिक मनपा १, अहमदनगर ११, जळगाव २, पुणे १७, पुणे मनपा १, पिंपरी-चिंचवड मनपा ३, सोलापूर ७, सातारा १२, कोल्हापूर ८, कोल्हापूर मनपा २, सांगली २१, सांगली मिरज कुपवाड मनपा ६, सिंधुदुर्ग ८, रत्नागिरी ३, औरंगाबाद २४, औरंगाबाद मनपा २, उस्मानाबाद ४, बीड ८, अकोला मनपा २, अमरावती १, अमरावती मनपा १, यवतमाळ ३, नागपूर ३, नागपूर मनपा ५, वर्धा १ इ. रुग्णांचा समावेश आहे.