Join us

मुंबईत गुरुवारी ७८९ रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबईत दिवसभरात ७८९ रुग्णांची नोंद झाली आहे, १० मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून, ...

मुंबई : मुंबईत दिवसभरात ७८९ रुग्णांची नोंद झाली आहे, १० मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून, ७२६ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या १४ हजार ८१० सक्रिय रुग्ण आहेत.

शहर उपनगरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख २४ हजार ११३ वर पोहोचला आहे, मृतांचा एकूण आकडा १५ हजार ३४८ वर पोहोचला आहे. ५४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने, रुग्ण बरे होण्याची संख्या ६ लाख ९१ हजार ६७० वर पोहचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. १७ ते २३ जूनदरम्यान मुंबईतील कोविड वाढीचा दर ०.०९ टक्के आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ११ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत, तर ८७ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी ३५ हजार ७६४ तर, आतापर्यंत एकूण ६९ लाख ४७ हजार २९० चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

८७९ रुग्ण गंभीर अवस्थेत

मुंबईतील सक्रिय रुग्णांपैकी ८७९ रुग्ण गंभीर अवस्थते असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ९ हजार ५१८ लक्षणविरहित रुग्ण असून, ४ हजार १८० रुग्णांमध्ये सौम्य व मध्यम लक्षणे आहेत.