Join us

सायबर हेल्पलाईनमुळे २४ तासांत वाचले ७९ लाख

By मनीषा म्हात्रे | Published: November 30, 2023 6:42 PM

सायबर गुन्ह्यामध्ये फसवणुक झालेली रक्कम सबंधित बँक खात्यामध्ये गोठविण्याकरीता मुंबई पोलीस गुन्हे शाखे अंतर्गत १९३० हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सायबर हेल्पलाईनमुळे मुंबईतील नागरिकांचे २४ तासांत ७९ लाख ३७ हजार रुपये वाचवण्यात यश आले. सायबर फसवणुकीचे शिकार ठरलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरातील नागरीकांची सायबर गुन्ह्यामध्ये फसवणुक झालेली रक्कम सबंधित बँक खात्यामध्ये गोठविण्याकरीता मुंबई पोलीस गुन्हे शाखे अंतर्गत १९३० हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

२८ नोव्हेंबर रोजी सायबर फसवणुक झालेल्या वेगवेगळया तक्रारदारनी फसवणुक झाल्यानंतर १९३० हेल्पलाईनला संपर्क केला. हेल्पलाईनमधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ माहिती घेऊन तात्काळ संबंधित बँकेशी पाठपुरावा करत रक्कम गोठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाणेतील तक्रारदार यांचे ३२,१६,७६८, पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाणेतील एकुण ०५ तक्रारदारांसह ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाणेतील तक्रारदार यांचे रूपये दीड लाख असे एकूण ७९ लाख ३७ हजार ११६ गोठविण्यात यश आले आहे. तसेच, नागरिकांनीही सायबर फसवणुकीची शिकार झाल्यास तात्काळ हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीसायबर क्राइम