७ व्या एशियन गोजू रिव्ह कराटे स्पर्धेत भारतीय संघाला प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिप

By मनोहर कुंभेजकर | Published: June 26, 2023 06:10 PM2023-06-26T18:10:05+5:302023-06-26T18:10:11+5:30

भारताचे मुख्य प्रशिक्षक बी. के. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातून १९ खेळाडूंची निवड करण्यात आली होती.

7th Asian Goju Rive Karate Championship for Indian Team First Place Championship | ७ व्या एशियन गोजू रिव्ह कराटे स्पर्धेत भारतीय संघाला प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिप

७ व्या एशियन गोजू रिव्ह कराटे स्पर्धेत भारतीय संघाला प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिप

googlenewsNext

मुंबई: ७ व्या एशियन गोजू रिव्ह कराटे चॅम्पियनशिप नेपाळ काठमांडू येथे दि, १६ ते १७ जून  रोजी आयोजित स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य अध्यक्ष  धीरज भीमराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली १७२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. भारताचे मुख्य प्रशिक्षक बी. के. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातून १९ खेळाडूंची निवड करण्यात आली होती.

त्यात सहभागी खेळाडू गार्गी धनवी -सुवर्ण, आरव नारकर- कांस्य , श्वेता बागुल, भुवी सावंत, श्रेया चव्हाण, प्राची चव्हाण - एक सुवर्ण व एक कांस्य , सृष्टी चव्हाण - ,सुवर्ण,  आर्या तीलवे - एक रौप्य व दोन कांस्य , सुदेशना कुवरे-रौप्य व एक कांस्य , गायत्री कूवरे-एक सुवर्ण व एक कांस्य ,इच्छा राऊल- एक रौप्य व एक कांस्य, वेदांती साळकर- एक सुवर्ण व एक रौप्य , अथर्व बांधिवडेकर - सुवर्ण, तनूष शेट्टी- दोन सुवर्ण व  एक कांस्य , अर्पित भगत - एक सुवर्ण व एक कांस्य, आदित्य भोसले- कांस्य , स्वरा वालावलकर - कांस्य पदक या खेळाडूंचा सहभाग होता. 

महाराष्ट्राला एकूण १० सुवर्ण पदके , ४ रौप्य  आणि १२ कांस्य पदके मिळाली.  श्रेयसी पवार व रुतुजा भगत या दोघींनी एशियन रेफ्रीची परीक्षा दिली व रेफ्री म्हणून उत्तीर्ण झाल्या .आणि भारताला पहिल्या क्रमांकाची चॅम्पियनशिप मिळवून दिली . भारताला एकूण ३२ सुवर्ण, ४३ रौप्य, ६८ कांस्य पदके मिळवली. सहाय्यक प्रशिक्षक म्हणून उषा पवार यांनी दौऱ्यावर खेळाडूंची विशेष जबाबदरी घेतली.

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाजाचे उपकार्याध्यक्ष व आरजेएमडीएस इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष सहदेव सावंत, समाजसेविका व संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांनी या अभिमानास्पद यशाबद्दल प्रशिक्षक, विद्यार्थी व पालकांचे  अभिनंदन करून  त्यांना पुढील वाटचाली करीता मार्गदर्शन करून उज्वल कारकिर्दी करीता शुभेच्छा दिल्या.

Web Title: 7th Asian Goju Rive Karate Championship for Indian Team First Place Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई