पक्षी निरीक्षकांनी केली ३० पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:20 AM2019-11-13T00:20:39+5:302019-11-13T00:20:43+5:30
पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त ‘बर्ड वॉक टू शिलोंडा ट्रेल’ या पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मुंबई : पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त ‘बर्ड वॉक टू शिलोंडा ट्रेल’ या पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मंगळवारी सकाळच्या सुमारास पक्षी निरीक्षण करण्यात आले. यावेळी पक्षिप्रेमींनी ३० पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद केली.
पक्ष्यांचे निरीक्षण कसे करावे, पक्ष्यांच्या अधिवासाबाबतची माहिती अमेय केतकर यांनी पक्षिप्रेमींना दिली. निरीक्षणामध्ये १० ते १५ पक्षिप्रेमी सहभागी झाले होते.
तीन तास चाललेल्या पक्षी निरीक्षणामध्ये पक्षिप्रेमींनी ३० पक्ष्यांच्या प्रजाती पाहिल्या व त्यांची माहिती घेतली. पक्षी निरीक्षणाचे ठळक वैशिष्ट्ये म्हणजे सहा ठिकाणी इंडियन ग्रे हॉर्नबिल हा पक्षी निदर्शनास आला, अशी माहिती निसर्ग माहिती केंद्राचे जयेश विश्वकर्मा यांनी दिली.