११ विकासकांकडून ८ कोटी ५७ लाखांची वसुली; महारेराने ग्राहकांना नुकसान भरपाईपोटी जारी

By सचिन लुंगसे | Published: May 22, 2023 11:33 AM2023-05-22T11:33:44+5:302023-05-22T11:34:20+5:30

महारेराने  ग्राहकांना नुकसान भरपाईपोटी जारी  केलेले वारंटस वसूल व्हावे, यासाठी महारेरा सातत्याने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संपर्कात आहे .

8 crore 57 lakhs recovered from 11 developers | ११ विकासकांकडून ८ कोटी ५७ लाखांची वसुली; महारेराने ग्राहकांना नुकसान भरपाईपोटी जारी

११ विकासकांकडून ८ कोटी ५७ लाखांची वसुली; महारेराने ग्राहकांना नुकसान भरपाईपोटी जारी

googlenewsNext

मुंबई : महारेराने  ग्राहकांना नुकसान भरपाईपोटी जारी  केलेले वारंटस वसूल व्हावे, यासाठी महारेरा सातत्याने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संपर्कात आहे . महारेराच्या पाठपुराव्यामुळे अनेक ठिकाणी संबंधित विकासकांच्या मिळकती जप्त करून लिलावाच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. लवकरच राज्यात आणखी काही ठिकाणी असे लिलाव होणार आहेत. परिणामी आपली मिळकत  जप्त होऊ नये यासाठी आता  काही ठिकाणी विकासक पुढे येऊन या नुकसान भरपाईच्या रकमा भरत आहेत किंवा संबंधित ग्राहकांशी तडजोड करून नुकसान भरपाईचा प्रश्न निकाली काढत आहेत. या पद्धतीने 20 वारंटसपोटी  मुंबई उपनगर, मुंबई शहर , रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील 11 विकासकांनी 8 कोटी 57 लाख 26 हजार 846 रुपये एवढी रक्कम जमा केलेली आहे. 

महारेराने आतापर्यंत 624.46 कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईच्या वसुलीसाठी 1007 वारंटस जारी केलेले आहेत. यापैकी आतापर्यंत 124 वारंटसची 113.17 कोटीची रक्कम वसूल करण्यात महारेराला यश आलेले आहे. उर्वरित रक्कमही वसूल व्हावी यासाठी महारेरा सातत्याने  प्रयत्नशील आहे. ज्यांनी रकमा जमा केल्यात किंवा ग्राहकांशी तडजोडी केल्या त्यात मुंबई उपनगरातील विधी रिअल्टर्स, स्कायस्टार  बिडकाॅन, लोहितका  प्रॉपर्टीज, व्हिजन डेव्हलपर्स आणि   विजयकमल प्रॉपर्टीज   अशा 5  विकासकांचा यात समावेश असून त्यांनी अनुक्रमे 4 कोटी 1 लाख 97 हजार, 57 लाख 84 हजार, 17 लाख 40 हजार, 37 लाख ,   25 लाख 66 हजार 137 अशी एकूण  5 कोटी 39  लाख  87 हजार 137 एवढ्या रकमेचे दावे निकाली काढलेले आहेत. रक्कम जमा केलेली आहे.

व्हिजन डेव्हलपर्स प्रकरणी मा. उच्च न्यायालयात समेट झालेला आहे. तर विधी रिअल्टर्स आणि विजयकमल प्रॉपर्टीज यांनी ग्राहकांशी तडजोड करून, तडजोडीच्या प्रतींची उप निबंधकांच्या कार्यालयात रितसर नोंदणी करून घेतलेली आहे.

मुंबई शहरातील मातोश्री प्रॉपर्टीज, श्री सदगुरू डिलक्स आणि फलक डेव्हलपर्सनीही 3 वारंटसचे  अनुक्रमे 22 लाख 50 हजार, 15 लाख 75 हजार आणि 9 लाख 70 हजार  550 असे एकूण 47 लाख 95 हजार  550 जमा करण्यात आलेले आहेत. 

अलिबाग भागातील( जिल्हा रायगड) विनय अग्रवाल या विकासकाकडे 13 वारंटसपोटी नुकसान भरपाईची 1 कोटीच्यावर देणी आहेत. त्यापैकी त्यांनी  न्यायाधिकरणाकडे ( Tribunal)  78 लाख 85 हजार 431 रुपये एवढी रक्कम जमा केलेली आहे. यातून 10 वारंटसची पूर्तता होणार आहे.

ठाणे येथील रवी डेव्हलपर्स आणि नताशा डेव्हलपर्स या दोन विकासकांनी  तडजोड करून  एकेक  वारंटसपोटी अनुक्रमे 1 कोटी 19 लाख 58 हजार 728 आणि  71 लाख रूपये जमा केलेले आहेत.

एकूण 11 विकासकांनी  20 वारंटसपोटी  8 कोटी 57 लाख 26 हजार 846 रूपये   जमा केलेले आहेत. काहींनी याबाबतचे  दावे निकाली काढलेले आहेत.

Web Title: 8 crore 57 lakhs recovered from 11 developers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.