११९ पोर्न चित्रपटाच्या विक्रीसाठी ८ कोटी ८८ लाखांची डील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:06 AM2021-07-24T04:06:09+5:302021-07-24T04:06:09+5:30

कुंद्राच्या व्यवहाराचे चॅटिंग गुन्हे शाखेच्या हाती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज कुंद्राला पोर्न चित्रपटातून महिन्याला ५ ते १० ...

8 crore 88 lakh deal for sale of 119 porn movies | ११९ पोर्न चित्रपटाच्या विक्रीसाठी ८ कोटी ८८ लाखांची डील

११९ पोर्न चित्रपटाच्या विक्रीसाठी ८ कोटी ८८ लाखांची डील

Next

कुंद्राच्या व्यवहाराचे चॅटिंग गुन्हे शाखेच्या हाती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज कुंद्राला पोर्न चित्रपटातून महिन्याला ५ ते १० लाख रुपयांचा नफा होत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने तयार केलेल्या ११९ पोर्न चित्रपटांच्या विक्रीसाठी ८ कोटी ८८ लाखांना डील सुरू असल्याबाबतचे चॅटिंग गुन्हे शाखेच्या हाती लागले आहे. याबाबत गुन्हे शाखा तपास करत आहे.

कुंद्राने हॉटशॉटद्वारे किती अश्लील चित्रपट प्रसारित केले? यातून कीती पैसे मिळविले? याचा लेखाजोखा गुन्हे शाखेच्या हाती लागला आहे. कुंद्रा आणि रायन थाॅर्पचा लॅपटॉप जप्त करण्यात आला. यात २४ हार्डडिस्क ३ सॅन बॉक्स, ८ सर्व्हरची सायबर तज्ज्ञांच्या मदतीने केलेल्या पडताळणीत हॉटशॉट आणि बॉलीफेम लोगो असलेले ५१ अश्लील व्हिडिओ मिळाले आहेत.

कुंद्राच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप संदेशातून केनरिन कंपनीशी झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबतचे चॅटिंग दिसते. तसेच प्रदीप बक्षीच्या चॅटिंगमध्ये ११९ पोर्न चित्रपटाची यादी आहे. त्यातच हॉटशॉट सबंधित ई-मेल बंद करण्याबाबत चर्चा झाल्याचेही दिसते.

१९ जुलै रोजी कुंद्राच्या कार्यालयात केलेल्या झाडाझडतीदरम्यान हॉटशॉटचे अकाउंट सांभाळत असलेल्या महिलेने सांगितले की, कुंद्राच्या सांगण्यावरून मी हे काम पाहत असून दर महिन्याला जमा होणाऱ्या मोबदल्याचे विश्लेषण करून त्याबाबतचा तपशील कुंद्रा आणि बक्षीला मेल करते. शिवाय यातून सर्व खर्च वजा करता ऑगस्ट २०१९ ते नोव्हेंबर २०२० दरम्यान महिन्याला ४ ते १० हजार पौण्डमध्ये नफा झाल्याचेही तिने म्हटले आहे. यातील सर्व नोंदी गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्या आहेत.

यातच एका चॅटिंगमधून कुंद्रा त्याच्या ११९ चित्रपटांची १.२ मिलियन डॉलरमध्ये एकाला विक्री करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने हा करार केला आहे का? यात व्हिडिओ ट्रान्सफर केले आहेत का? याबाबत गुन्हे शाखा तपास करत आहे.

जानेवारीमध्ये तयार केले बॉलीफेम ॲप

जानेवारीमध्ये कुंद्राच्या सांगण्यावरून बॉलीफेम ॲप तयार करण्यात आले. यात कंपनीतील कर्मचारी उमेश कामत आणि जॉर्ज यंग सर्व व्हिडिओ अपलोड करत होते. गुन्हे शाखेने बॉलीफेम लोगो असलेले १६ व्हिडिओ जप्त केले आहेत.

अटकसत्रानंतर पुरावे नष्ट करण्याची धडपड

गुन्हे शाखेने फेब्रुवारीमध्ये हे रॅकेट उघडकीस आणल्यानंतर कुंद्राने हॉटशॉट संबंधित सर्व डाटा रायनला डिलीट करण्यास सांगितला. त्यानुसार महत्त्वाचा डाटा नष्ट करण्यात आला. त्यापाठोपाठ कुंद्राच्या बॉलीफेम टेकच्या ग्रुपमध्ये हॉटशॉट संबंधित ॲप, ईमेल, कंटेंटची माहिती डिलीट करण्याबाबत सूचना दिसत आहेत. २१ जुलै रोजी बक्षीने ते डिलीट केल्याची माहिती समोर आली आहे. हा सर्व डाटा मिळविण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

कुंद्रा म्हणे मी केनरिन कंपनीचा भागीदार

गुन्हे शाखेने जप्त केलेल्या एका चॅटिंगमध्ये लंडनस्थित असलेल्या केनरिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मी भागीदार असल्याचे कुंद्रा सांगत आहे. याबाबतही चौकशी सुरू आहे.

Web Title: 8 crore 88 lakh deal for sale of 119 porn movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.