Join us

इंडिगो विमानात ८ किलो सोने

By admin | Published: August 18, 2015 2:07 AM

दुबईहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या इंडिगो विमानाच्या शौचालयात सोमवारी तब्बल ८ किलो सोने सापडले. याप्रकरणी कस्टमच्या एअर

मुंबई : दुबईहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या इंडिगो विमानाच्या शौचालयात सोमवारी तब्बल ८ किलो सोने सापडले. याप्रकरणी कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) सोने हस्तगत केले असून त्याची किंमत १ कोटी ८२ लाख इतकी आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोने तस्करी रोडावलेली असतानाच इतक्या मोठया प्रमाणात सोने आढळल्याने एअर इंटेलीजन्स युनीटच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबई विमानतळावर हे विमान उतरल्यावर प्रवासी निघून गेल्यानंतर खासगी सुरक्षा रक्षकांनी जेव्हा विमानाची झाडाझडती घेतली तेव्हा विमानाच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयात एक बेवारस पिशवी आढळली. ती उघडली असता त्यात प्रत्येकी एक किलो वजनाची ८ सोन्याची बिस्किटे आढळली असल्याची माहिती ‘एआययू’चे अप्पर आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी दिली.हे विमान पुढे चेन्नईला जाणार होते.सोने विमानात कोणी चढवले, ते कुठे व कोण उतरवून घेणार होते याबाबत एआययूने तपास करत असल्याचे लांजेवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)