आठ लाखांचे मेफेड्रोन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 04:59 AM2019-01-20T04:59:23+5:302019-01-20T04:59:26+5:30
बंदी असलेल्या मेफेड्रोनची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून, त्याच्याकडील आठ लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.
मुंबई : बंदी असलेल्या मेफेड्रोनची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून, त्याच्याकडील आठ लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. गणेश अशोक पठारे (वय ३०, रा. बीएमसी कॉलनी, संतोषनगर, फिल्मसिटी रोड, गोरेगाव), असे त्याचे नाव असून, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर शाखेने शुक्रवारी रात्री ही कारवाई केली.
विक्रोळीतील वर्षानगरातील बेस्टच्या रूट क्र. ४१८, ३८६ येथील बस स्टॉपच्या परिसरात उत्तेजक पदार्थाची विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती, पथकाच्या घाटकोपर शाखेचे निरीक्षक वधवाने, सहायक निरीक्षक विनोद शिवडकर यांच्या पथकाला समजली. त्यानी परिसरात सापळा रचून संशयास्पदरित्या फिरत असलेल्या पठारेला पकडले. झडती घेतली असता त्याच्याकडे २०० ग्रॅम मेफेडोनच्या गोळ्या मिळून आल्या. त्यांची अंदाजे किंमत आठ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.