राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी मुंबईच्या ८ प्रकल्पांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 01:53 AM2018-12-04T01:53:06+5:302018-12-04T01:53:13+5:30

यंदाच्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत मुंबईच्या ८ प्रकल्पांची निवड झाली आहे.

8 selected projects in Mumbai for National Child Science Council | राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी मुंबईच्या ८ प्रकल्पांची निवड

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी मुंबईच्या ८ प्रकल्पांची निवड

Next

मुंबई : यंदाच्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत मुंबईच्या ८ प्रकल्पांची निवड झाली आहे. या परिषदेसाठी पात्र ठरण्याचे अत्यंत खडतर आव्हान मुंबईच्या ८ बालवैज्ञानिकांनी साध्य करून दाखविले असून राष्ट्रीय स्तरासाठीचे आव्हान आता समोर असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, मुंबई विभागाचे अध्यक्ष बी. बी. जाधव यांनी दिली.
राज्य स्तरावरील बालविज्ञान परिषद ही तुळजापूरजवळील हरळी या गावी ज्ञान प्रबोधिनी या प्रशालेत ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर या दिवशी पार पडली. या वर्षी मुंबईतून या स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर २५१ प्रकल्प सहभागी झाले. त्यातून २० प्रकल्पांची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी करण्यात आली. संपूर्ण राज्यातून १५३ प्रकल्प निवडले गेले होते. येथे राज्य स्तरासाठी ७३ प्रकल्प निवडले गेले. या ७३ प्रकल्पांमध्ये मुंबईचे १४ प्रकल्प होते. या १४ प्रकल्पांपैकी एकूण ८ प्रकल्पांनी बाजी मारली आणि त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर केली आहे. हे प्रकल्प भुवनेश्वर येथे २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पार पडणाऱ्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत सहभागी होणार आहेत, असे जाधव यांनी सांगितले.
> लहान गटातील ४ प्रकल्प
(१) ‘क्लोरोफिलिसिटी हीच शाश्वत ऊर्जा’ हा प्रकल्प सेंट जॉन्स हायस्कूल. बोरिवली पश्चिम येथील विवेककुमार यादव या विद्यार्थ्याने बनविला आहे.
(२) टेट्रा पॅक आणि प्लास्टिक बॉटल्स यांच्यापासून बनविलेल्या वस्तूंचा तुलनात्मक अभ्यास या नावाचा प्रकल्प अरविंद गंडभीर, जोगेश्वरी च्या शाळेतील गुंजन सागवेकर या विद्यार्थिनीचा आहेत.
(३) घाण कचरा व्यवस्थापन या नावाचा प्रकल्प डॉन बॉस्को या शाळेतील जॉफ्री नाडर या विद्यार्थ्याने सादर केला आहेत.
(४) ध्यानी शाह याने स्वाध्याय भवन, वडाळा फायलोरेमेडीशन यावर संशोधन केले आहे.
>मोठ्या गटातील ४ प्रकल्प
(१) व्हीपीएम विद्या मंदिर, दहिसर, विद्यार्थी; अगस्ती देशपांडे, मार्गदर्शन: रेश्मा शिंदे
(२) अझिझा खान, होली एंजेल्स, मुलुंड पश्चिम , मार्गदर्शन अनिता राजशेखर.
(३) निधी गुप्ता, साधना विद्यालय, सायन, मार्गदर्शक सिद्धी देसाई.
(४) वृत्ती पटेल, जे. जे. अकॅडेमी, मुलुंड पश्चिम, मार्गदर्शन गायत्री राणे.

Web Title: 8 selected projects in Mumbai for National Child Science Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.