मुंबईत दिवसभरात ८ हजार ४७९ रुग्ण, तर ५३ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:06 AM2021-04-19T04:06:30+5:302021-04-19T04:06:30+5:30
मुंबई : राज्यासह मुंबईत कठोर नियम लावल्यानंतरही दैनंदिन रुग्णसंख्या व मृत्यूंच्या संख्येत फरक पडलेला नाही. कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता गडद ...
मुंबई : राज्यासह मुंबईत कठोर नियम लावल्यानंतरही दैनंदिन रुग्णसंख्या व मृत्यूंच्या संख्येत फरक पडलेला नाही. कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता गडद होत असून, प्रशासनासमोर नियंत्रणाचे आव्हान कठीण होत चालले आहे. मुंबईत रविवारी ८ हजार ४७९ रुग्ण आढळले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाख ७९ हजार ३११वर पोहोचला आहे तर रविवारी ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १२ हजार ३४७वर पोहोचला आहे. ८ हजार ७८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४ लाख ७८ हजार ३९वर पोहोचली आहे.
मुंबईत सध्या ८७ हजार ६९८ सक्रिय रुग्ण आहेत तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के असून, रुग्ण दुप्पटीचा कालावधी ४५ दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळलेल्या १०० चाळी आणि झोपडपट्ट्या कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. १ हजार १८८ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत.
कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात ४६ हजार ९७१ चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत ४९ लाख ४५ हजार ९७६ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. दिनांक ११ ते १७ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड रुग्णवाढीचा दर १.५३ टक्के असल्याची नोंद आहे. मागील २४ तासात पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील ३६ हजार ३५६ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.