मुंबईत काेराेनाचे ८ हजार ५८२ रुग्ण उपचाराधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:06 AM2021-06-28T04:06:40+5:302021-06-28T04:06:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत बरे झालेल्या काेराेना रुग्णांचे प्रमाण ९६ टक्के असून २० ते २६ जूनपर्यंत एकूण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत बरे झालेल्या काेराेना रुग्णांचे प्रमाण ९६ टक्के असून २० ते २६ जूनपर्यंत एकूण कोविड वाढीचा दर ०.०९ टक्के आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ७२८ दिवसांवर पोहोचला आहे. शहर,उपनगरात ८ हजार ५८२ रुग्ण उपचाराधीन आहेत.
मुंबईत ७४६ रुग्ण आणि १३ मृत्यूंची नोंद झाली आहे. शहर, उपनगरातील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख २० हजार ३५६ इतकी असून मृतांचा एकूण आकडा १५ हजार ३९६ झाला आहे. दिवसभरात कोरोनाच्या ३२ हजार ७११ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ७० लाख ४४ हजार ६५८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
दिवसभरात १ हजार २९५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ६ लाख ९४ हजार ८२ रुग्णांनी कोराेनावर मात केली. शहर, उपनगरातील चाळ व झोपडपट्ट्यांमध्ये १२ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ८२ आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील ५ हजार ९९० अतिजोखमीच्या संपर्कांचा शोध घेतला आहे.
.................................