मुंबईतून दरदिवशी ८ वाहनांची चोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 05:09 AM2018-12-10T05:09:56+5:302018-12-10T05:10:20+5:30

गेल्या १० महिन्यांत २ हजार ६९४ वाहने चोरीला गेल्याची नोंद मुंबई पोलिसांच्या दप्तरी झाली आहे. यापैकी केवळ १ हजार वाहनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

8 vehicles steal every day from Mumbai! | मुंबईतून दरदिवशी ८ वाहनांची चोरी!

मुंबईतून दरदिवशी ८ वाहनांची चोरी!

Next

मुंबई : मुंबईतून दरदिवशी ८ वाहने चोरीला जात असल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून उघड झाली आहे. गेल्या १० महिन्यांत २ हजार ६९४ वाहने चोरीला गेल्याची नोंद मुंबई पोलिसांच्या दप्तरी झाली आहे. यापैकी केवळ १ हजार वाहनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

दिवसा आणि रात्री होणाऱ्या घरफोडींबरोबरच वाहन चोरीच्या तक्रारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या वर्षी मुंबईतून ३ हजार १२ वाहने चोरीला गेली होती. यापैकी ९३५ वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली, तर उर्वरित वाहनांचे गूढ कायम आहे.
या वर्षी जानेवारी ते ऑक्टोंबर या कालावधीत २ हजार ६९४ वाहन चोरीचे गुन्हे मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये दुचाकीसह महागड्या कारचा समावेश आहे. यापैकी १ हजार ५४ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, उर्वरित १ हजार ६४० वाहनांचे गूढ कायम आहेत. या वाहनांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर गुन्ह्यांच्या उकलीचे प्रमाण कमी असल्यामुळे या वर्षाच्या सुरुवातीलाच वाहन चोरी विरोधी कक्ष बंद करण्यात आला. स्थानिक पोलीस ठाण्यांसह मालमत्ता कक्षाचे अधिकारी या सर्व गुन्ह्यांचा छडा लावत आहेत.

एटीएसची जीपही चोरीला...
दहशतवाद्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवून त्यांचे नापाक मनसुबे उधळून लावणाºया राज्य दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) एका चोरट्याने नाकीनऊ आणले होते. या महाप्रतापी चोरट्याने मे महिन्यात टिळकनगर पोलीस क्वार्टर्स परिसरात पहाटेच्या सुमारास पार्क केलेल्या एटीएसची बोलेरो जीप घेऊन पळ काढला होता. या प्रकारामुळे मुंबईत सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. काही दिवसांनंतर ही जीप रस्त्याच्या कडेला सापडली. मात्र, चोरीचे गूढ अद्याप कायम आहे.

पार्किंगमधून चोरी
माहिम येथील व्यावसायिक मुकेश मदनलाल (३७) यांनी २०१३ मध्ये महागडी कार खरेदी केली. ५ तारखेला रात्री ८.३०च्या सुमारास वाहन भगवानसिंग कॉलनीजवळील पोस्ट आॅफिसजवळ पार्क करून ते निघून गेले. ६ तारखेला कारसाठी गेले असता, कार गायब होती. या प्रकरणी माहिम पोलीस अधिक तपास करत आहेत.

काचा फोडून सामानावरही मारला डल्ला
मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि बेंंगलोर अशा मोठ्या शहरांतील महागड्या कारच्या काचा फोडून, त्यातील महागड्या सामानावर डल्ला मारणाºया टोळीचा गेल्या वर्षी मुलुंड पोलिसांनी पर्दाफाश केला होता. यात जाहीद मेहराज उर्फ बटल्या (२९) कादर तोहरूद्दीन शेख (३८) आणि जुबेर अहमद रहीस खान (२७) या तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. पोलिसांनी गेल्या काही वर्षांतील सुमारे १०० गुन्हे उघडकीस आणत, मुंबईच्या चोर बाजारात विकलेल्या ७ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ६१ कार टेप
जप्त केल्या होत्या.

Web Title: 8 vehicles steal every day from Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.