डंपरखाली चिरडून ८ वर्षीय मुलाचा मृत्यू; चालकासह दोघांना मालवणीत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:07 AM2021-01-19T04:07:38+5:302021-01-19T04:07:38+5:30

मालवणीमधील अपघात : डंपरचालकासह क्लिनरला अटक सुधारित कॉपी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भरधाव डंपरखाली चिरडून आठ वर्षांच्या चिमुरड्याचा ...

8-year-old boy crushed to death under dumper; Both arrested along with driver in Malwani | डंपरखाली चिरडून ८ वर्षीय मुलाचा मृत्यू; चालकासह दोघांना मालवणीत अटक

डंपरखाली चिरडून ८ वर्षीय मुलाचा मृत्यू; चालकासह दोघांना मालवणीत अटक

Next

मालवणीमधील अपघात : डंपरचालकासह क्लिनरला अटक

सुधारित कॉपी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भरधाव डंपरखाली चिरडून आठ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. सोमवारी मालवणीमध्ये हा प्रकार घडला असून, याप्रकरणी मालवणी पोलिसांनी चालकासह क्लिनरला अटक केली.

अजय बाबू पवार (वय ८) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो मालवणीच्या अंबोजवाडी परिसरात राहात होता. साेमवारी दुपारी तो मालवणी परिसरात सायकलवरून फेऱ्या मारत होता. त्यावेळी एक डंपरचालक गाडी रिव्हर्स घेत होता. त्यामुळे मागे असलेल्या अजयकडे त्याचे लक्ष गेले नाही आणि त्याची जोरदार धडक अजयच्या सायकलला लागून तो खाली कोसळला व डंपरच्या मागच्या चाकाखाली आला. डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या अजयचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.

याबाबत त्याच्या आई-वडिलांना समजताच त्यांनी नातेवाईकांसह पोलीस ठाण्याला घेराव घातला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढून जमावाला पांगवले. तसेच चालक आदिल अन्सारी (४०) या चालकासह समीर बाबू अहमद शेख (१९) या क्लिनरला अटक केली. यापुढे त्या परिसरात मोठ्या गाड्यांना शक्यतो प्रवेश देण्यात येणार नसल्याचे आश्वासनही दिले.

...........

Web Title: 8-year-old boy crushed to death under dumper; Both arrested along with driver in Malwani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.