कामे अपूर्ण ठेवूनही ठेकेदारांना 80 कोटी
By admin | Published: July 30, 2014 02:02 AM2014-07-30T02:02:52+5:302014-07-30T02:02:52+5:30
जलस्वराज्य योजनेद्वारे 11क् कोटी रूपये खर्च करून जिल्ह्यात नळ पाणीपुरवठा योजना सुरू केल्या.
Next
सुरेश लोखंडे - ठाणो
जलस्वराज्य योजनेद्वारे 11क् कोटी रूपये खर्च करून जिल्ह्यात नळ पाणीपुरवठा योजना सुरू केल्या. त्यातील बहुतांशी योजना अद्यापही पूर्ण झालेल्या नसतांना त्यांची सुमारे 8क् कोटी रूपयांची बिले अधिका:यांच्या संगनमताने काढून संबंधीत ठेकेदारांनी पोबारा केला आह़े यामुळे बहुतांशी नळपाणीपुरवठा योजना अर्धवट असल्यामुळे त्यांचा लाभ गावक:यांना होत नसल्यामुळे त्यांच्या तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यावर जिल्हा नियोजन समितीने संबंधीतांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत़
या योजनांमध्ये भ्रष्टाचार करून योजना सुरू न करणा:या ग्राम नळ पाणीपुरवठा समित्यांसह संबंधीत ठेकेदाराची चौकशी करून त्यांच्यावरगुन्हे दाखल करण्याचा ठराव यावेळी डीपीडीसीने घेतला आहे. तर शहापूर, मुरबाड तालुक्यातील ग्राम नळ पाणीपुरवठा योजनाची चौकशी करून अपहार झालेली रक्कम ग्राम पंचायतींच्या खात्यावर जमा करण्यात आल्याचे ठाणो जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर गायकवाड यांनी सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले आहे. तर या योजनेमध्ये जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या अपहाराची चौकशी करून कारवाई करण्याच्या चर्चेत खासदार कपील पाटील यांच्यासह अन्यही सदस्यांनी सहभाग घेतला. या आधीही आमदार चिंतामण वनगा यांनी या भ्रष्टाचारासंदर्भात चर्चा करून 11क् कोटींच्या या योजनेतील सुमारे 8क् कोटी रूपयांचे बिल काम न करता काढून घेतल्याची सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले होते. ही 11क् कोटी रूपयांतील नळ पाणीपुरवठय़ाची कामे दहा वर्षातही पूर्ण झाली नाहीत. या जलस्वराज्य योजनेव्दारे जिल्ह्यातील 117 ग्राम पंचायतींमध्ये नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. या योजना पूर्ण होण्या आधीच 8क् कोटी रूपयांच्या बिलांची रक्कम ठेकेदाराने काढून पोबारा केला आहे. विहिरी अर्धवट खोदलेल्या आहेत, पाइपलाइनसाठी खोदकाम झाले, मात्र त्यात पाइपच टाकलेले नाही. पाण्याच्या टाक्यांची बांधकामे अर्धवट झालेली आहेत. तर काही ठिकाणी टाक्यांमध्ये पाणीपुरवठाच झालेला नाही. पण शासनदप्तरी नळपाणी पुरवठा योजना राबवल्याचे दाखविण्यात आले आहे.
जलस्वराज्य योजनेखाली पाणी पुरवठय़ासाठी 229 विहिरींपैकी 212 विहिरींचे कामे करण्यात आले. त्यातील 2क्क् विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. असे असले तरी त्यातील बहुतांशी विहिरींना पाणीच नाही. तर 11 विहिरींची कामे झाली नाही. 216 जुन्या विहिरींच्या दुरूस्तींचे कामांचे नियोजन होते. प्रत्यक्षात केवळ 2क्5 विहीरीचे कामे हाती घेण्यात आली. त्यातूनही केवळ 196 विहिरींची दुरूस्ती झाली असून 9 विहिरींची कामे झालीच नाही. 216 हातपंपांपैकी केवळ 213 हातपंप घेण्यात आले असले तरी बहुतांश ठिकाणी त्यातून पाणीच येत नाही. तर नळ पाणीपुरवठय़ाच्या 92 योजना हाती घेण्यात आल्या. त्यातील 59 योजना पूर्ण झाल्या आहेत. 33 नळ पाणीपुरवठा योजना झालेल्याच नाही. या योजना राबवण्यासाठी एकूण खर्चाच्या दहा टक्के लोकवर्गणी ग्रामस्थांकडून भरण्यात आलेली आहे. पण योजना अद्याप पूर्ण झाली नाही. यास कारणीभूत ठरणा:या संबंधित अधिका:यांचा शोध घेऊन त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाणो जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे.