Join us

बेस्टच्या ताफ्यात लवकरच ८० इलेक्ट्रिक बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 1:40 AM

बसगाड्या खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीची मुदत संपुष्टात येत आहे.

मुंबई : बसगाड्या खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीची मुदत संपुष्टात येत आहे. आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला या बसगाड्या तातडीने खरेदी कराव्या लागणार असल्याचे प्रशासनाने न्यायालयापुढे स्पष्ट केले. यामुळे या बस खरेदीला न्यायालयाची परवानगी मिळाली असून ८० इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत, अशी माहिती महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत दिली.बेस्टमधील तूट वर्षागणिक वाढत असल्याने पालिका प्रशासनाने केलेल्या शिफारशीनुसार ८० इलेक्ट्रिक बसगाड्या खरेदी करण्यात येणार होत्या. यासाठी केंद्राकडून ५० कोटी रुपयांची सबसिडी मिळणार होती.परंतु बेस्ट उपक्रमाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संघटनांनी केला होता. त्यामुळे हा वाद न्यायालयात पोहोचला होता. परिणामी या बसगाड्यांच्या खरेदीवर स्थगिती आली होती.केंद्रीय अवजड वाहतूक मंत्रालयाकडून बेस्ट उपक्रमाला इलेक्ट्रिक (बॅटरी) वर चालणाºया गाड्या खरेदी करण्यासाठी निधी मिळणार आहे. या ८० गाड्या दिलेल्या मुदतीत खरेदी न केल्यास हा निधी परत जाणार होता. ही संधी हातची जाऊ नये म्हणून न्यायालयाला विनंती केली. त्यानुसार बसगाड्या खरेदीला परवानगी मिळाली असल्याचे महाव्यवस्थापकांनी बेस्ट समितीच्या बैठकीत सांगितले.>बसगाडीची वैशिष्ट्येबस रस्त्यावरून जाताना बाहेर धूर सोडत नाही.बसगाड्यांना कमीत कमी आवाज असल्यामुळे बस प्रवाशांना आवाजविरहित प्रवासाचा सुखद अनुभव.इतर बसगाड्यांच्या तुलनेत कमी देखभालीची आवश्यकता.बसगाडीच्या प्रवर्तनामध्ये घट.एका गाडीची किंमत एक कोटीच्या आसपास आहे. या गाड्यांसाठी केंद्राकडून ४० टक्के सबसिडी मिळणार आहे.