मुलुंडमधून ८० लाखांची घरफोडी करणाऱ्याला अटक
By admin | Published: March 11, 2017 01:36 AM2017-03-11T01:36:12+5:302017-03-11T01:36:12+5:30
मुलुंडमध्ये एका बंद फ्लॅटचे लॉक तोडून ८० लाखांची घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला मालमत्ता कक्षाने अटक केली आहे. राजेश मुरगेश शेट्टी असे आरोपीचे नाव असून
मुंबई : मुलुंडमध्ये एका बंद फ्लॅटचे लॉक तोडून ८० लाखांची घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला मालमत्ता कक्षाने अटक केली आहे. राजेश मुरगेश शेट्टी असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ८० लाख किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
गुलशन को-आॅपरेटिव्ह सोसायटीमध्ये २८ डिसेंबर रोजी ही घटना घडली. घरातून दागिने, पैशांसह तब्बल ८० लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे याचा तपास मालमत्ता कक्षाकडे वर्ग करण्यात आला. राजेश कांदिवली परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार राजेशला बेड्या ठोकण्यात आल्या. या गुन्ह्यात चोरीस गेलेले ३ किलो ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. राजेशला न्यायालयाने १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)