देशांतर्गत विमानांना ८० टक्के प्रवासी क्षमतेचे बंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:06 AM2021-04-27T04:06:20+5:302021-04-27T04:06:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे हवाई वाहतूक विभाग सतर्क झाला आहे. विमानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे हवाई वाहतूक विभाग सतर्क झाला आहे. विमानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, या उद्देशाने विमानांची प्रवासी क्षमता मर्यादित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार देशांतर्गत विमानांना ८० टक्के प्रवासी क्षमतेचे बंधन घालण्यात आले आहे.
नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सोमवारी याबाबतचे आदेश जारी केले. विमान प्रवासावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी देशांतर्गत विमानांची प्रवासी क्षमता ८० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात येत आहे. ३१ मे २०२१ पर्यंत हे निर्बंध लागू राहतील. या आदेशाचे पालन न करणाऱ्या विमान कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे.
या निर्णयामुळे विमान कंपन्यांचे नुकसान होऊ नये यासाठी उर्वरित खर्चाचा भार प्रवाशांवर टाकण्यात येईल. प्रवाशांच्या तिकिटांमधून हे पैसे वसूल करण्यासाठी तिकीट दरात तात्पुरती वाढ करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
...................................