२९ पैकी २ आमदारांना ८० टक्के; प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 12:06 PM2023-07-12T12:06:50+5:302023-07-12T12:07:12+5:30

२०२२-२३ वर्षात विधिमंडळात झालेल्या अधिवेशनात सादर केलेल्या ५,१६६ प्रश्नांपैकी सर्वाधिक प्रश्न नागरी विषय ९८३, आरोग्य ७१५, शिक्षण ५८१ या विषयांवर आहेत.

80 percent to 2 out of 29 MLAs; As revealed by the Praja Foundation report | २९ पैकी २ आमदारांना ८० टक्के; प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून उघड

२९ पैकी २ आमदारांना ८० टक्के; प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून उघड

googlenewsNext

मुंबई - मुंबईतील ९६ लाख मतदारांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिलेल्या शहरातील २९ आमदारांनी वर्षभरात झालेल्या अधिवेशनात केवळ ५,१६६ प्रश्नच विधिमंडळात विचारले आहेत. त्यापैकी पाचशेपेक्षा कमी प्रश्नांना सभागृहात उत्तरे मिळाली आहेत. उर्वरित नागरी प्रश्नांच्या उत्तरांची अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे नागरी प्रश्न विधिमंडळात ठामपणे विचारायला आणि त्याची उत्तरे घेण्यास २९ आमदारांपैकी केवळ २ आमदारांना ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. उर्वरित २७ आमदार उदासीन असल्याचे प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या मुंबईतील आमदारांच्या प्रगती पुस्तकात दिसून येते.

२०२२-२३ वर्षात विधिमंडळात झालेल्या अधिवेशनात सादर केलेल्या ५,१६६ प्रश्नांपैकी सर्वाधिक प्रश्न नागरी विषय ९८३, आरोग्य ७१५, शिक्षण ५८१ या विषयांवर आहेत. मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना केवळ ५४४ प्रश्न विचारले. भ्रष्टाचार आणि घोटाळे याविषयी दररोज ओरड असताना केवळ ४९६ प्रश्न आमदारांनी विचारले आहेत.

विशेष म्हणजे मुंबईत प्रदूषणाची समस्या गंभीर असताना २९ आमदारांनी केवळ ७५ प्रश्न विचारले आहेत. वाहतूककोंडीने नागरिक हैराण असताना सार्वजनिक वाहतुकीबाबत २८७ प्रश्न आहेत विधिमंडळाच्या प्रति अधिवेशनाचा सरासरी कालावधी ६० टक्क्यांनी कमी झाला आहे. १२व्या विधिमंडळात १५ दिवस असलेला कालावधी १४व्या विधिमंडळात ६ दिवस होता. याच कालावधीत विचारलेल्या प्रश्नांची संख्या ११,२१४ वरून १४व्या अधिवेशात ३,७४९ एवढी ६ टक्क्यांनी कमी होती. अशात नागरिक प्रश्नांना प्राधान्य हवे होते. तसे न होत उदासीनता दिसते.

दरम्यान, फाउंडेशनच्या वती- दरवर्षी आमदारांचे प्रगती पुस्तक मांडले जाते. त्यातून नेमके कित आमदारांनी कुठल्या विषयांवर प्रश्न विचारले, किती आमदार गप्प हो याची माहिती मतदारांना मिळते त्यामुळे आपण निवडून दिलेल लोकप्रतिनिधी कसे वागतात याच चित्रच डोळ्यासमोर उभे राहते

पटेल, प्रभू, चौधरी अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे

हिवाळी अधिवेशन २०२१ ते हिवाळी अधिवेशन २०२२ या कालावधीत मुंबईतील २९ आमदारांची सभागृहातील उपस्थिती, शिक्षण, पोलिस केसेस आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी या ४ निकषांवर २९ आमदारांपैकी काँग्रेस पक्षाचे आमदार अमिन पटेल यांनी पहिला, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी दुसरा आणि भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी तिसरा क्रमांक पटकाविला आहे. उर्वरित १६ आमदारांना ८० • टक्क्यापेक्षा खाली आणि ११ आमदारांना केवळ ५० टक्के गुण मिळविता आले आहेत

Web Title: 80 percent to 2 out of 29 MLAs; As revealed by the Praja Foundation report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.