Join us

राज्यात काेराेनाचे ८० हजार ७९ सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 4:04 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात काेराेनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४ टक्क्यांवर आले असून रविवारी दिवसभरात ७ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात काेराेनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४ टक्क्यांवर आले असून रविवारी दिवसभरात ७ हजार ४८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १७ लाख २३ हजार ३७० रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या ८० हजार ७९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात रविवारी काेराेनाच्या ४ हजार ७५७ रुग्णांचे निदान झाले असून ४० मृत्यूंची नोंद झाली. परिणामी , कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८ लाख ५२ हजार २६६ झाली असून मृतांचा आकडा ४७ हजार ७३४ एवढा आहे. राज्यातील मृत्यूचे प्रमाण सध्या २.५८ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १२ लाख ७३ हजार ७०५प्रयोगशाळा नुमुन्यांपैकी १६.४३ टक्के नुमने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५६ हजार ८५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५ हजार ९०३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.