Join us

दिवसभरात मुंबईत कोरोनाच्या ८०० रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2023 2:13 PM

संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे दिसते आहे. कोरोनाच्या विषाणूमध्ये होणाऱ्या जनुकीय बदलांमुळे संसर्ग झपाट्याने पसरत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. मागील काही दिवसांत राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ दिसून येत आहे. राज्यात गुरुवारी ८०३ रुग्णांची नोंद झाली असून, उपचाराधीन रुग्ण संख्या तीन हजार ९८७ इतकी आहे.

राज्यात दिवसभरात तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या मृत्युदर १.८२ टक्के आहे. याखेरीस, चोवीस तासांत ६७८ रुग्ण कोविडमुक्त झाले असून, आतापर्यंत ७९ लाख ९५ हजार २३२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९८.१३ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या आठ कोटी ६६ लाख ७५ हजार ७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ०९.४० टक्के नमुने पाॅझिटिव्ह आले आहेत. राज्यात आतापर्यंत ८१ लाख ४७ हजार ६७३ कोविड रुग्णांची नोंद आहे. दरम्यान, नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

एच३एन२चे ३८८ रुग्ण

  • राज्यात जानेवारी ते मार्च या कालावधीत एच३एन२चे ३८८, तर स्वाइन फ्ल्यूचे ४७९ रुग्ण आढळले आहेत. 
  • आतापर्यंत तीन लाख ८० हजार ४७५ संशयितांची नोंद झाली असून, त्यातील दोन हजार २४५ संशयित फ्ल्यू रुग्णांना ऑसेलटॅमीवीर औषध देण्यात आले आहे. 
  • राज्यात स्वाइन फ्ल्यूमुळे तीन तर एच३एन२मुळे पाच रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. याव्यतिरिक्त वाशिम येथील एका रुग्णाचा संशयित मृत्यू झाला असून, मृत्यू परीक्षणानंतर मृत्यूनिश्चिती करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. 
  • ८०३  ६ एप्रिल 
  • ५६९  ५ एप्रिल
  • ७११  ४ एप्रिल  
  • २४८  ३ एप्रिल  
  • ५६२  २ एप्रिल 
  • ६६९   १ एप्रिल 
टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई