३ वर्षांत सायबरचे ८ हजार गुन्हे दाखल, २०१७ मध्ये सर्वाधिक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 03:27 AM2018-02-12T03:27:12+5:302018-02-12T03:27:19+5:30

सरकार कॅशलेस व आॅनलाइन व्यवहारांसाठी प्रोत्साहन देत असताना, दुसरीकडे सायबर गुन्ह्यांचा आलेख सातत्याने वाढत चालला आहे. गेल्या ३ वर्षांमध्ये राज्यात तब्बल ७ हजार ९०६ गुन्हे दाखल झाले असून, त्यातील ८० टक्के गुन्हे हे मुंबई, ठाणे, पुणे या महानगरांतील आहेत.

 8000 cases of cyber crime filed in 3 years, the highest incidents in 2017 | ३ वर्षांत सायबरचे ८ हजार गुन्हे दाखल, २०१७ मध्ये सर्वाधिक घटना

३ वर्षांत सायबरचे ८ हजार गुन्हे दाखल, २०१७ मध्ये सर्वाधिक घटना

googlenewsNext

जमीर काझी 
मुंबई : सरकार कॅशलेस व आॅनलाइन व्यवहारांसाठी प्रोत्साहन देत असताना, दुसरीकडे सायबर गुन्ह्यांचा आलेख सातत्याने वाढत चालला आहे. गेल्या ३ वर्षांमध्ये राज्यात तब्बल ७ हजार ९०६ गुन्हे दाखल झाले असून, त्यातील ८० टक्के गुन्हे हे मुंबई, ठाणे, पुणे या महानगरांतील आहेत. २०१७ या वर्षामध्ये तब्बल ३,३३१ सायबर गुन्हे दाखल असून, त्यातून कोट्यवधींची रक्कम लुबाडण्यात आली आहे. त्यापूर्वीच्या दोन वर्षांच्या तुलनेत हा आकडा दीड पटीहून अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
सायबर गुन्ह्यामध्ये सर्वाधिक घटना या बॅँक खात्यावरून परस्पर रक्कम काढणे आणि ईमेल, फेसबुक, टिष्ट्वटर अकाउंट हॅक करून फसवणूक करण्याच्या आहेत.
वाढत्या ‘पोस्ट व्हायरल’च्या घटना
सायबर गुन्ह्याला प्रतिबंध घालण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान कायदा (आयटी अ‍ॅक्ट) २००० बनविण्यात आला. त्यामध्ये गुन्हा सिद्ध झालेल्या आरोपीला ३ ते ५ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी ‘आयटी’बरोबरच आयपीसी व विशेष विधि कायद्याचाही त्यामध्ये समाविष्ट केला जातो. आॅनलाइन आर्थिक फसवणुकीबरोबरच सोशल मीडियावरून तरुणी, महिलांबद्दल अश्लील पोस्ट, छायाचित्रे व मेसेज पाठविणे; तसेच त्यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्याच्या घटनाही वाढत आहेत.

Web Title:  8000 cases of cyber crime filed in 3 years, the highest incidents in 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.