Join us

राज्यात म्युकरमायकोसिसचे ८०८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:05 AM

मुंबई : राज्याचा कोरोना लढा सुरू असताना म्युकरमायकोसिस रुग्णदेखील वाढत होते. आता मात्र म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या कमी होत असल्याची ...

मुंबई : राज्याचा कोरोना लढा सुरू असताना म्युकरमायकोसिस रुग्णदेखील वाढत होते. आता मात्र म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या कमी होत असल्याची दिलासादायी वृत्त आहे. म्युकरवर उपचार करण्यास केईम रुग्णालय सज्ज असून, राज्यभरातील म्युकरचे रुग्ण केईएम रुग्णालयात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता म्युकरमायकोसिसचा संसर्गही कमी झाल्याने वैद्यकीय क्षेत्रातून दिलासा व्यक्त करण्यात येत आहे; मात्र तरीही कोरोनामुक्तीनंतर योग्य काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

शुक्रवारपर्यंत १९४ रुग्ण उपचार घेत असून, यात ६१ रुग्ण मुंबईतील असून, १३३ रुग्ण मुंबई बाहेरील असल्याचे केईएम रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. केईएम रुग्णालयात उपचारासाठी राज्यातील इतर भागातून आलेले ५७० आणि मुंबईतील २३८ असे मिळून एकूण ८०८ म्युकरमायकोसिसचे रुग्ण असल्याचे दिसत आहेत.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मुंबईत ५८ रुग्ण उपचाराधीन असून, आतापर्यंत १३१ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले. यात आतापर्यंत ४९ मृत झाले आहेत. मुंबईतील रुग्णांची एकूण संख्या २३८ असल्याचे काकाणी म्हणाले. तर राज्यातून इतर भागातून केईएम रुग्णालयात उपचार घेत असलेले ५७० रुग्ण असून, आतापर्यंत ३२९ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले. सध्या १३१ सक्रिय रुग्ण असून, आतापर्यंत ११० रुग्ण मृत पावले असल्याची माहिती काकाणी यांनी दिली आहे.