मुंबई : हिंदुजा रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णाने उपचार घेतल्यामुळे तेथील डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी, अतिदक्षता विभागातील रुग्ण अशा एकूण ८२ लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यापैकी ७४ लोकांना त्यांच्या घरातच स्वतंत्र ठेवण्यात आले आहे.
पुढील १४ दिवस त्यांच्यावर देखरेख ठेवून त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून येतात का? याची खात्री करण्यात येणार आहे, तर त्या रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आलेल्या आठ हाय रिस्क रुग्णांना हिंदुजा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या थुंकीच्या नमुन्याची कस्तुरबा रुग्णालयात चाचणी करण्यात येत आहे.मुंबईतील रुग्ण संख्या चारहिंदुजा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या पत्नीची चाचणीदेखील शुक्रवारी सकारात्मक आल्याने मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत एकने वाढ होऊन आता कोरोनाचे ४ रुग्ण झाले आहेत.