दोडामार्गात ८३ टक्के मतदान

By Admin | Published: November 1, 2015 10:21 PM2015-11-01T22:21:09+5:302015-11-02T00:21:43+5:30

शांततेत हक्क बजावला : ४८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

83 percent polling in Doda | दोडामार्गात ८३ टक्के मतदान

दोडामार्गात ८३ टक्के मतदान

googlenewsNext

दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत ८३ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी किरकोळ कुरघोडी वगळता सतराही प्रभागात शांततेत मतदान करण्यात आले. एकूण २४९५ मतदारांपैकी २०७२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. १७ प्रभागातील ४८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
कसई- दोडामार्ग या नगरपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले. या निवडणुकीत १७ प्रभागात एकूण ४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंंगणात उभे होते. त्यात सेनेचे आठ, भाजपचे नऊ, काँगे्रसचे दहा तर राष्ट्रवादीचे सात आणि अपक्ष म्हणून नऊ व मनसेचे चार उमेदवार निवडणूक लढवित होते. मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. सकाळीच मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यात येत होते. दुपारी १२ वाजेपर्यंत ५० टक्के मतदान झाले होते. तर उर्वरित मतदान संध्याकाळच्या सत्रात पार पडले. प्रभागनिहाय मतदान खालीलप्रमाणे :
प्रभाग १ मध्ये एकूण मतदारांची संख्या १०१ होती. त्यापैकी ८२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग २ मध्ये १४६ पैकी १०७ मतदारांनी मतदान केले. प्रभाग ३ मध्ये १४२ पैकी ११४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग ४ मध्ये १२६ पैकी ११०, प्रभाग ५ मध्ये १४८ पैकी १२१, प्रभाग ६ मध्ये २२० पैकी १७८, प्रभाग ७ मध्ये १८० पैकी १५४, प्रभाग ८ मध्ये १५८ पैकी १३२, प्रभाग ९ मध्ये १७० पैकी १४२, प्रभाग क्र. १० मध्ये ११७ पैकी १०४, प्रभाग ११ मध्ये १४८ पैकी १२०, प्रभाग १२ मध्ये १०१ पैकी ९६, प्रभाग १३ मध्ये १५५ पैकी १२६, प्रभाग १४ मध्ये १५९ पैकी १४१, प्रभाग १५ मध्ये १७७ पैकी १२९, प्रभाग १६ मध्ये १३० पैकी ११३, प्रभाग १७ मध्ये ११७ पैकी १०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
तालुक्यातील या नगरपंचायतीचे निवडणूक मतदान प्रक्रिया अगदी शांततेत पार पडली. सर्व मतदान केंद्रांवर पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी, सावंतवाडी विभागीय पोलीस निरीक्षक उत्तम चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, भाजप-शिवसेना, मनसे, अपक्ष आणि आरपीआयचे उमेदवार रिंगणात असल्याने सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आज सकाळपासूनच दोडामार्ग शहरात दाखल झाले होते. ते सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रावर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 

तहसीलमध्ये मतमोजणी : दोन तासात चित्र स्पष्ट
४सोमवारी सकाळी १० वाजता दोडामार्ग तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. अवघ्या दोन तासात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने या निवडणूक रिंगणात असलेल्या ४८ मतदारांपैकी कोण बाजी मारतो आणि या नगरपंंचायतीवर कोणाची सत्ता येईल, हे चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: 83 percent polling in Doda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.