राज्यात काेराेनाचे ८३ हजार २२१ सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:18 AM2020-11-26T04:18:01+5:302020-11-26T04:18:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात ५ हजार ४३९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून ३० मृत्यूंची ...

83 thousand 221 active patients of Kareena in the state | राज्यात काेराेनाचे ८३ हजार २२१ सक्रिय रुग्ण

राज्यात काेराेनाचे ८३ हजार २२१ सक्रिय रुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात ५ हजार ४३९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून ३० मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, एकूण कोरोनाबधितांचा आकडा १७ लाख ८९ हजार ८०० झाला असून मृतांचा आकडा ४६ हजार ६८३ वर गेला आहे. सध्या राज्यात ८३ हजार २२१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९२.६९ टक्क्यांवर पोहोचला असून मृत्युदर २.६१ टक्के आहे. मंगळवारी ४ हजार ८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १६ लाख ५८ हजार ८७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या ५ लाख ३६ हजार ६४९ व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत, तर ६ हजार २२१ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

Web Title: 83 thousand 221 active patients of Kareena in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.