Join us

८३३ कोटी रु.च्या नागरी प्रकल्पांना मंजुरी

By admin | Published: February 23, 2017 4:14 AM

राज्यातील नागरी क्षेत्राच्या विकासाला गती देण्यासाठी पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि उड्डाणपूलांच्या

मुंबई : राज्यातील नागरी क्षेत्राच्या विकासाला गती देण्यासाठी पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि उड्डाणपूलांच्या एकूण ८३३ कोटी ७१ लाख रु पये किंमतीच्या १२ प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली.अमृत अभियानांतर्गत मलनिस्सारण प्रकल्पासाठी कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर या दोन शहरांसाठी अनुक्र मे १५३ कोटी ३८ लाख आणि ७२ कोटी ४७ लाख रु पये मंजूर करण्यात आले आहेत. तर पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत भिवंडी-निजामपूर शहरासाठी २०५ कोटी ५२ लाख, नांदेड-वाघाळा शहरासाठी २४ कोटी १२ लाख, परभणीसाठी १०२ कोटी ९४ लाख, बीडसाठी ११४ कोटी १९ लाख आणि शिर्डी शहरासाठी ३६ कोटी ६५ लाख रु पये मंजूर करण्यात आले आहेत.या सात प्रकल्पांची एकूण किंमत ७०९ कोटी २७ लाख रु पये इतकी आहे. या अभियानांतर्गत २६ पाणीपुरवठा आणि एका मलनिस्सारण प्रकल्पास राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत पाच प्रकल्पांच्या एकूण १२४ कोटी ४४ लाख रु पयांच्या प्रकल्पांना देखील आज मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी लोणावळा नगरपरिषदेला ३३ कोटी ४८ लाख, अहमदपूर नगरपालिकेला ४४ कोटी ५२ लाख, चिखलदरा नगरपालिकेला ३ कोटी ८१ लाख, दोंडाईचा-वरवाडे नगरपंचायतीला २० कोटी ९१ लाख रु पयांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. (विशेष प्रतिनिधी)