बॅड पॅचेससाठी ८४ कोटी; १५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 03:22 PM2023-05-16T15:22:08+5:302023-05-16T15:22:52+5:30

वॉर्ड अधिकारी आणि मध्यवर्ती रस्ते विभागाने कार्यकारी अभियंत्यांकडून आपल्या विभागातील रस्त्यांवरील बॅड पॅचेस शोधून पावसाळ्यापूर्वी ते नेमून दिलेल्या संस्थेकडून त्यांची डागडुजी करून घेण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिल्या आहेत. 

84 crore for Bad Patches; Instructions to complete the work by 15th June | बॅड पॅचेससाठी ८४ कोटी; १५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना

बॅड पॅचेससाठी ८४ कोटी; १५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना

googlenewsNext


मुंबई : पालिकेकडून पावसाळ्यापूर्वीची रस्त्यांची कामे सुरु असताना आता रस्त्यांवरील बॅड पॅचेस बुजविण्यासाठी प्रभागनिहाय निधीची तरतूद केली आहे. प्रत्येक वॉर्डांसाठी एरिया आणि मागणी लक्षात घेऊन निधी मंजूर केला आहे. वॉर्ड अधिकारी आणि मध्यवर्ती रस्ते विभागाने कार्यकारी अभियंत्यांकडून आपल्या विभागातील रस्त्यांवरील बॅड पॅचेस शोधून पावसाळ्यापूर्वी ते नेमून दिलेल्या संस्थेकडून त्यांची डागडुजी करून घेण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिल्या आहेत. 

मुंबई पालिका क्षेत्रातील ७ प्रभागांसाठी एकूण ८४ कोटींची तरतूद केली आहे. मुंबई शहरासाठी २७, पश्चिम उपनगरांसाठी ३९ तर पूर्व उपनगरांसाठी १८ कोटी मंजूर केले आहेत. निविदांचा कालावधी ४५ दिवसांचा असल्याने वॉर्ड अधिकाऱ्यांनी ही कामे येत्या ३० दिवसांत म्हणजे १५ जूनपर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश पी वेलरासू यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागाला दिलेला निधी हा वॉर्ड अधिकाऱ्यांच्या मागणीपेक्षा अधिक असून यापेक्षा अधिक मागणी त्यांनी करू नये. जर आवश्यकता लागलीच तर त्यासाठीची मागणी त्यांना करावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

प्रभाग - १
ए वॉर्ड -     ३ कोटी
बी वॉर्ड -     ३ कोटी
सी वॉर्ड -         ३ कोटी
डी वॉर्ड -     ३ कोटी
इ वॉर्ड -     ३ कोटी
एकूण     १५ कोटी
प्रभाग २
एफ दक्षिण -     ३ कोटी
एफ उत्तर -     ३ कोटी
जी दक्षिण -     ३ कोटी
जी उत्तर -     ३ कोटी
एकूण -         १२ कोटी
प्रभाग ३
एच पूर्व -     २. ७५ कोटी
एच पश्चिम -     ३. ५० कोटी
के पूर्व -     २. ७५ कोटी
एकूण -     ९ कोटी
प्रभाग ४
पी दक्षिण -     ४. २५ कोटी
पी उत्तर -     ४. २५ कोटी
के पश्चिम -     ६. ५० कोटी
एकूण -     १५ कोटी
प्रभाग ५
एल -     ३ कोटी
एम पूर्व -     ३ कोटी
एम पश्चिम -     ३ कोटी
एकूण -     ९ कोटी
प्रभाग ६
एन -     २. ७५ कोटी
एस -     २. ७५ कोटी
टी -     ३. ५० कोटी
एकूण -     ९ कोटी
प्रभाग ७
आर दक्षिण -     ५ कोटी
आर उत्तर -     ५ कोटी
आर मध्य -     ५ कोटी
एकूण -     १५ कोटी
 

Web Title: 84 crore for Bad Patches; Instructions to complete the work by 15th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.