Join us

बॅड पॅचेससाठी ८४ कोटी; १५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 3:22 PM

वॉर्ड अधिकारी आणि मध्यवर्ती रस्ते विभागाने कार्यकारी अभियंत्यांकडून आपल्या विभागातील रस्त्यांवरील बॅड पॅचेस शोधून पावसाळ्यापूर्वी ते नेमून दिलेल्या संस्थेकडून त्यांची डागडुजी करून घेण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिल्या आहेत. 

मुंबई : पालिकेकडून पावसाळ्यापूर्वीची रस्त्यांची कामे सुरु असताना आता रस्त्यांवरील बॅड पॅचेस बुजविण्यासाठी प्रभागनिहाय निधीची तरतूद केली आहे. प्रत्येक वॉर्डांसाठी एरिया आणि मागणी लक्षात घेऊन निधी मंजूर केला आहे. वॉर्ड अधिकारी आणि मध्यवर्ती रस्ते विभागाने कार्यकारी अभियंत्यांकडून आपल्या विभागातील रस्त्यांवरील बॅड पॅचेस शोधून पावसाळ्यापूर्वी ते नेमून दिलेल्या संस्थेकडून त्यांची डागडुजी करून घेण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिल्या आहेत. मुंबई पालिका क्षेत्रातील ७ प्रभागांसाठी एकूण ८४ कोटींची तरतूद केली आहे. मुंबई शहरासाठी २७, पश्चिम उपनगरांसाठी ३९ तर पूर्व उपनगरांसाठी १८ कोटी मंजूर केले आहेत. निविदांचा कालावधी ४५ दिवसांचा असल्याने वॉर्ड अधिकाऱ्यांनी ही कामे येत्या ३० दिवसांत म्हणजे १५ जूनपर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश पी वेलरासू यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागाला दिलेला निधी हा वॉर्ड अधिकाऱ्यांच्या मागणीपेक्षा अधिक असून यापेक्षा अधिक मागणी त्यांनी करू नये. जर आवश्यकता लागलीच तर त्यासाठीची मागणी त्यांना करावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

प्रभाग - १ए वॉर्ड -     ३ कोटीबी वॉर्ड -     ३ कोटीसी वॉर्ड -         ३ कोटीडी वॉर्ड -     ३ कोटीइ वॉर्ड -     ३ कोटीएकूण     १५ कोटीप्रभाग २एफ दक्षिण -     ३ कोटीएफ उत्तर -     ३ कोटीजी दक्षिण -     ३ कोटीजी उत्तर -     ३ कोटीएकूण -         १२ कोटीप्रभाग ३एच पूर्व -     २. ७५ कोटीएच पश्चिम -     ३. ५० कोटीके पूर्व -     २. ७५ कोटीएकूण -     ९ कोटीप्रभाग ४पी दक्षिण -     ४. २५ कोटीपी उत्तर -     ४. २५ कोटीके पश्चिम -     ६. ५० कोटीएकूण -     १५ कोटीप्रभाग ५एल -     ३ कोटीएम पूर्व -     ३ कोटीएम पश्चिम -     ३ कोटीएकूण -     ९ कोटीप्रभाग ६एन -     २. ७५ कोटीएस -     २. ७५ कोटीटी -     ३. ५० कोटीएकूण -     ९ कोटीप्रभाग ७आर दक्षिण -     ५ कोटीआर उत्तर -     ५ कोटीआर मध्य -     ५ कोटीएकूण -     १५ कोटी 

टॅग्स :मुंबईखड्डेमुंबई महानगरपालिका