मेट्रोसाठी व्यापलेला ८४ किमी रस्ता खुला; ३३ हजार बॅरिकेड्स हटविले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 02:24 PM2023-06-29T14:24:03+5:302023-06-29T14:25:05+5:30
मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ३३७ किमी लांब मेट्रोचे जाळे प्राधिकरणामार्फत उभारण्यात येत आहे.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्सून दरम्यान रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मेट्रो प्रकल्पातील उन्नत मार्गाचे काम जिथे जिथे झाले आहे; तेथील बॅरिकेड्स काढण्याचा निर्णय घेतला आहे. ६ मेट्रो प्रकल्पातील एकुण ३३ हजार ९२२ बॅरिकेडस काढल्याने दुतर्फा ८४.८०६ (४२ किमी एकेरी रस्ता) किलो मीटर लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे.
मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ३३७ किमी लांब मेट्रोचे जाळे प्राधिकरणामार्फत उभारण्यात येत आहे. त्यापैकी मेट्रो मार्ग २ब, ४, ४अ, ५, ६, ७ अ आणि ९ या मेट्रो मार्गांसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्स पैकी सुमारे ६० टक्के बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी १-१ मार्गिका वाहतूकीसाठी उपलब्ध झाली आहे. काही ठिकाणी बॅरिकेड्स ठेवणे अपरिहार्य होते तिथे ते रस्त्याची कमीत कमी जागा व्यापतील, अशा पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला गेला. ज्यामुळे अशा ठिकाणी ८ किमीहून लांबीचा अधिक रुंद रस्ता उपलब्ध झाला आहे. एकुण ३३५२ बॅरिकेड्स अशा पद्धतीने कमी जागा व्यापतील असे लावण्यात आले आहेत.
____
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग, बीकेसी, एस. व्हि.रोड, वी.एन. पुरव मार्ग (चेंबूर नाका), न्यू लिंक रोड, गुलमोहर रोड, एम जी रोड, घोडबंदर रोड, कापूरबावडी, बाळकुम, दहिसर, मिरारोड, भाईंदर, ठाणे, तीन हात नाका, जेव्हिएलआर, इन्फिनिटी मॉल, पवई, कांजूरमार्ग, मानखुर्द या भागातील बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत. ज्यामुळे प्रकल्पाच्या दोन्ही बाजूची १- १ मार्गिका वाहतूकीसाठी मोकळी करून नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
____
दर १५ दिवसांनी मेट्रोच्या कामाचा आणि बॅरिकेड्सचा आढावा घेतला जाईल. एखाद्या ठिकाणी काम संपले की लगेचच तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करुन दिला जाईल. तसेच रस्त्यांलगतचे सर्व बॅरिकेड्स कमीत कमी जागेत लावून जास्तीत जास्त रस्ता रहदारी साठी मोकळा ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए
_____
बॅरिकेड्स हटवण्यात आलेल्या काही रस्त्यांचा तपशील
मेट्रो मार्ग २ब
गुलमोहर रोड (जुहू सर्कल ते मिठीबाई महाविद्यालय) १.७६७ किमी
एस.व्ही. रोड (विले पार्ले जंक्शन ते मिलन सबवे)
१.०५७ किमी
बी.के.सी रोड (कलानगर ते एम टी एन एल )
१.५३६ किमी
वि.एन. पूर्व मार्ग (डायमंड गार्डन ते बी ए आर सी फ्लायओव्हर)
१.४०८ किमी
सायन- पनवेल हायवे (बी ए आर सी फ्लायओव्हर ते मानखुर्द फ्लायओव्हर)
१.४५९ किमी
_____
मेट्रो मार्ग ४आणि ४अ
९० फिट रोड
३.९९० किमी
एल.बी. एस मार्ग (वेगवेगळ्या तीन ठिकाणी)
१५ किमी
ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे
४.७२६ किमी
घोडबंदर रोड (वेगवेगळ्या दोन ठिकाणी)
४किमी
डेपो रोड
१.१५४किमी
____
मेट्रो मार्ग ५
कापूरबावडी ते बाळकुम नाका
१.५५३ किमी
बाळकुम नाका ते अंजूरफाटा
७.५७३ किमी
अंजूरफाटा ते धामणकर नाका
२.०३३ किमी
___
मेट्रो मार्ग ६
जे व्ही एल आर (वेव्ह जंक्शन ते महाकाली लेणी)
४.३० किमी
जे व्ही एल आर (महाकाली लेणी ते पवई तलाव)
४.१९किमी
जे व्ही एल आर (पवई तलाव- विक्रोळी - इ इ एच वर कांजूर मार्ग डेपो)
६.५ किमी
___
मेट्रो मार्ग ९
ओवारीपाडा जंक्शन ते दहिसर टोल
१.६४८ किमी
दहिसर टोल ते डेल्टा
१.७१० किमी