मुंबईत ८५,४९४ सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:06 AM2021-04-16T04:06:18+5:302021-04-16T04:06:18+5:30

मुंबई : मुंबईत दिवसभरात ८,२१७ रुग्ण आणि ४९ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता शहर उपनगरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५,५३,१५९ ...

85,494 active patients in Mumbai | मुंबईत ८५,४९४ सक्रिय रुग्ण

मुंबईत ८५,४९४ सक्रिय रुग्ण

Next

मुंबई : मुंबईत दिवसभरात ८,२१७ रुग्ण आणि ४९ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता शहर उपनगरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५,५३,१५९ झाली असून बळींचा आकडा १२,१८९ झाला आहे. सध्या मुंबईत ८५,४९४ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८२ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४२ दिवसांवर आला आहे. ८ ते १४ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.६४ टक्के असल्याची नोंद आहे. मुंबईत दिवसभरात ४५,४८६ चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत एकूण ४८ लाख १ हजार २१९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईत झोपडपट्टी आणि चाळींच्या परिसरात ९५ सक्रिय कंटेनमेंट झोन असून, १ हजार १०० सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील २८,२९५ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.

जी उत्तर विभागात पुन्हा संसर्गाचा धोका

मुंबईतील जी उत्तर प्रभागातील धारावी, दादर आणि माहिम परिसरातील कोरोनाची भीती पुन्हा वाढली आहे. एप्रिल महिन्यात या तिन्ही परिसरातील रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. मार्च २०२१ मध्ये काही दिवस वगळता या ठिकाणी दर दिवशी ५०च्या दरम्यान रुग्ण सापडत होते. मात्र, आता दररोज १०० च्या वर रुग्ण सापडत आहेत.

Web Title: 85,494 active patients in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.