Join us

८५९ बांधकामे पालिकेच्या रडारवर! 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 2:09 PM

कोणत्या सूचनांचे पालन आवश्यक...?

मुंबई : बांधकाम प्रकल्पातून उडणाऱ्या धुळीमुळे निर्माण झालेल्या समस्येप्रकरणी पालिकेने यापूर्वीच वायूप्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बिल्डरांनी या निर्देशांचे पालन न केल्यास काम थांबवण्याची नोटीस किंवा कामाचे ठिकाण सील करणे, यांसारख्या कठोर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. त्यानुसार ३ नोव्हेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान या नियमांचे पालन न करणाऱ्या सुमारे २,९५५ कामांना पूर्वसूचना देण्यात आल्या आहेत. ६०३ बांधकामांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर, ८५९ बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस जारी करण्यात आल्या आहेत.  

मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. वातावरणातील बदलांमुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत मुंबई महापालिकेतील सर्व संबंधित खात्यांसह एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमएमआरसीएल, एमआयडीसी, क्रेडाई, एमसीएचआय, नरेडको यांनाही सूचना केल्या आहेत. पालिकेने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्याचे पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी वॉर्ड स्तरावर विशेष पथके ही नेमली आहेत. 

कोणत्या सूचनांचे पालन आवश्यक-  ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पाभोवती किमान ३५ फूट उंच पत्र्याचे आच्छादन नसणे.-   एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभवती किमान ३५ फूट आणि एक एकरपेक्षा कमी भूखंडावर किमान २५ फूट उंचीचे लोखंडी, पत्र्यांचे आच्छादन किंवा कापडांचे आच्छादन असावे.-   बांधकामांना हिरवे कापड झाकून बंदिस्त करणे, बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने पूर्णपणे झाकलेली असावी.-   बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असावेत आदी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न झाल्याने ही नोटीस बजावली आहे.-   १००० किमी रस्ते धुण्याचा निर्णय -   पालिकेच्या अखत्यारित सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. यातील सुमारे ७०० किमी रस्ते धुतले जात आहेत. यापुढे दररोज एक हजार किमी रस्ते धुवण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे. रस्ते धुण्यासाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जात आहे. काही ठिकाणी पहाटे ३ ते सकाळी ६ दरम्यान रस्ते धुण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाप्रदूषण