मुंबई: मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण, व्यवसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, पोलीस अधिकारी सचिन वाझेंना झालेली अटक, यानंतर परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप या सगळ्याचा सर्वाधिक फटका मुंबई पोलीस दल आणि त्यांच्या प्रतिष्ठेला बसला. यानंतर आता मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांमुळे मुंबई पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम झाला आहे. परमबीर सिंग यांना आयुक्तपदावरून हटवण्यात आल्यानंतर हेमंत नगराळेंनी सूत्रं हाती घेतली. यानंतर आता ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. यात गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाझेंचे निकटवर्तीय असलेल्या 'त्या' दोघांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 11:30 PM